विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानी हाय कमिशनची इफ्तार पार्टी आणि राष्ट्रीय दिन पडला फिका; तिथे पोहोचले फक्त मणिशंकर अय्यर आणि अभय चौटाला!!, असे काल नवी दिल्लीत घडले.
पाकिस्तानी हाय कमिशनने 23 मार्च या राष्ट्रीय दिनानिमित्त हाय प्रोफाईल इफ्तार पार्टी आयोजित केली होती. त्या इफ्तार पार्टीला पाकिस्तानी उच्चायुक्तांनी दिल्लीतल्या वेगवेगळ्या पक्षाच्या वरिष्ठ राजकीय नेत्यांना पत्रकारांना बुद्धिमत्तांना सोशलाईट लोकांना बोलावले होते. पण या इफ्तार पार्टीमध्ये काँग्रेसचे हाकलून दिलेले नेते मणिशंकर अय्यर आणि हरियाणातले लोक दलाचे नेते अभय चौटाला हे दोनच त्यातल्या त्यात नावं घेण्यासारखे नेते पोहोचले. बाकीचे कोणते राजकीय नेते, बुद्धिमंत, पत्रकार तिथे गेले होते, त्यांची नावे देखील समोर आली नाहीत. पण मनी शंकर अय्यर इथे गेल्यामुळे भाजपला काँग्रेसवर तोंड सुख घेण्याची संधी मिळाली. अनेकांनी Congress loves Pakistan असा हॅशटॅग चालवून काँग्रेसचे वाभाडे काढले. मनी शंकर अय्यर यांना पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारतात ते काही उत्तर न देता तेथून निघून गेले. अभय चौटाला मात्र पाकिस्तानी हाय कमिशनच्या निमंत्रणावर खुश झाले होते.
– शायनिंग निघून गेली
पण काही झाले तरी मोदींच्या राजवटीत पाकिस्तानी हाय कमिशनची इफ्तार पार्टी हळूहळू विझतच गेल्याचे दिसून आले. मोदींच्या आधीच्या यूपीएच्या राजवटीत पाकिस्तानी हाय कमिशनची इफ्तार पार्टी फारच हाय प्रोफाईल होत असे. त्यावेळी पाकिस्तानी हाय कमिशन मुद्दाम काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांना त्या इफ्तार पार्टीला बोलवत असे. मिरवाईज उमर फारूक, फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती वगैरे नेते आवर्जून त्या पार्टीला जात असत. पार्टीचे फोटो मोठमोठ्या राष्ट्रीय दैनिकांमध्ये झळकवले जात असत. पाकिस्तानी हाय कमिशन यानिमित्ताने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी शायनिंग मारून घेत असे.
पण मोदींच्या राजवटीने पाकिस्तानी हाय कमिशनची ही शायनिंग पूर्णपणे गुंडाळून ठेवली. पाकिस्तानी हाय कमिशनच्या इफ्तार पार्टीकडे भाजपचे नेते फिरकेनासे झाले. दिल्लीतल्या सत्ता वर्तुळातले बरेच नेते त्या पार्टीकडे दुर्लक्ष करू लागले. मोदी सरकारने काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांच्या गठड्या आवळल्यानंतर तर पाकिस्तानी हाय कमिशनच्या इफ्तार पार्टीची सगळी शायनिंग निघून गेली. म्हणून फक्त आता मणिशंकर अय्यर किंवा अभय चौटाला यांच्या पाहुणचारावर पाकिस्तानी हाय कमिशनला इफ्तार पार्टी उरकावी लागली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App