भोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर

वृत्तसंस्था

भोपळ : देशातील घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI च्या अड्ड्यांवर संबंधित विविध ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणा छापे घालून पीएफआयच्या म्होरक्यांची पाळेमुळे खणून काढत असतात अनेक धक्कादायक बाकी पुढे येत आहेत. Pakistani connections of Bhopal PFI leaders exposed

पीएफआय च्या म्होरक्यांचे देशांतर्गत दहशतवादी संघटनांशी संपर्क आहेतच पण त्याचबरोबर प्रत्यक्ष पाकिस्तान मध्ये देखील त्यांचे कनेक्शन सापडले आहे. PFI – पाकिस्तान कनेक्शनचे ढळढळीत पुरावे या छापेमारीतून समोर आले आहेत.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ मधून ताब्यात घेतलेल्या पीएफआय म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन देखील उघड झाले असून त्यांच्या मोबाईलमध्ये 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर सापडले आहेत. भोपाळ एटीएसने केलेल्या कारवाईत ही माहिती समोर आली आहे.

भोपाळ एटीएसने पीएफआयचा प्रदेशाध्यक्ष अब्दुल करीम, प्रदेश कोषाध्यक्ष मोहम्मद जावेद, प्रदेश सचिव जमील शेख आणि सचिव अब्दुल खालिद यांना अटक केली आहे. तसेच पीएफआयच्या अन्य काही सदस्यांना देखील अटक करण्यात आली असून हे आरोपी अनेक वेळा पाकिस्तानात गेले असल्याचे समजत आहे.

50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर

त्यामुळे आता यंत्रणांनी टेरर फंडिंगचे भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. अब्दुल खालिदच्या मोबाईल फोनमध्ये 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर सापडले आहेत. तसेच त्याचा भाऊ मोहम्मद महमूद हा 6 वेळा पाकिस्तानात गेला होता. पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.

आरोपींचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्ऱॉनिक वस्तूंची तपासणी पोलिस करत आहे. देशभरातील 15 राज्यांत असलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांची धरपकड एनआयए आणि राज्य एटीएसच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Pakistani connections of Bhopal PFI leaders exposed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात