इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानी अभिनेत्री मागतेय दिल्ली पोलिसांचा नंबर, दिल्ली पोलिसांनी दिलेल्या उत्तराने झाली बोलती बंद, आता होतेय ट्रोल

प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी 9 मे रोजी इस्लामाबाद येथून अटक करण्यात आली. त्यानंतर आता पाकिस्तानमध्ये एक ट्विट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी दिल्ली पोलिसांचा नंबर मागत होती. खरं तर, सहर शिनवारीने ट्विट केले आहे की, तिला पीएम मोदी आणि भारतीय गुप्तचर संस्था रॉविरोधात तक्रार दाखल करायची आहे. तिच्या या ट्विटवर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी (10 मे) सडेतोड उत्तर दिले.Pakistani actress Saher Shinwari is asking for Delhi Police After Imran Khan Arrest

शिनवारी हिने ट्विट केले की, दिल्ली पोलिसांची ऑनलाइन लिंक कोणाला माहीत आहे का? माझ्या देशात पाकिस्तानात अराजकता आणि दहशतवाद पसरवणाऱ्या भारतीय पंतप्रधान आणि भारतीय गुप्तचर एजन्सी रॉ यांच्या विरोधात मला तक्रार दाखल करायची आहे. जर भारतीय न्यायालये स्वतंत्र असतील तर मला खात्री आहे की भारतीय सर्वोच्च न्यायालय मला न्याय देईल.



भारतीय युझर्सनी केले ट्रोल

शिनवारीच्या ट्विटला उत्तर देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, त्यांना अजूनही पाकिस्तानमध्ये ज्युरिसडिक्शन- अधिकार क्षेत्र नाही. दिल्ली पोलिसांनी ट्विट केले आहे की, पाकिस्तानमध्ये अजूनही आमचे अधिकार नाहीत. यासोबतच दिल्ली पोलिसांनी प्रश्न विचारला की, तुमच्या देशात इंटरनेट बंद झाले आहे, मग तुम्ही कसे ट्विट करत आहात.

सहरच्या या ट्विटवर अनेक भारतीय लोक तिला चांगलेच ट्रोल करत आहेत. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात निदर्शने सुरू झाली. त्यामुळे पाकिस्तान सरकारने देशभरातील सोशल मीडिया आणि इंटरनेट सेवा बंद केली आहे.

जिओ न्यूजने वृत्त दिले आहे की इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहोर, कराची, गुजरांवाला, फैसलाबाद, मुलतान, पेशावर आणि मर्दानसह देशभरातील शहरांमध्ये पीटीआय कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली असून या हिंसाचारात आतापर्यंत 15 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Pakistani actress Saher Shinwari is asking for Delhi Police After Imran Khan Arrest

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात