पाकिस्तानची दहशतवाद्यांना 14 कोटींची नुकसान भरपाई, बहावलपूर, मुरिदके मध्ये terror heavens ची पुन्हा अंडी उबवणी!!

Pakistan rebuilding terror heavens

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाकिस्तानची दहशतवाद्यांना 14 कोटींची नुकसान भरपाई, बहावलपूर आणि मुरिदके मध्ये terror heavens ची पुन्हा अंडी उबवणी!!, असे घडू लागले आहे. कारण कुठल्याही चांगल्या गोष्टीचे पुनरुज्जीवन केले जाते, पण दहशतवादाची मात्र अंडीच उबवली जातात. तेच पाकिस्तानात पुन्हा घडू लागले आहे.Pakistan rebuilding terror heavens

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने केलेल्या हल्ल्यामध्ये बहावलपूर आणि मुरिदके इथली दहशतवाद्यांची मोठी केंद्रे उद्ध्वस्त झाली. 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. यामध्ये मौलाना मसूद अजहर याचे 5 नातेवाईक आणि 5 साथीदार मारले गेले. जैश ए मोहम्मद आणि अन्य दहशतवादी संघटनाची terror heavens नष्ट झाली. पाकिस्तानच्या हवाई दलाच्या एकूण शक्ति पैकी 20 % शक्ती अवघ्या चार दिवसांमध्ये संपुष्टात आली.



पण पाकिस्तानने इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाकडून मदतीच्या नावाखाली 1 बिलियन डॉलर्स उकळले. तेच आता दहशतवाद्यांच्या मदतीला आलेत. पाकिस्तानने मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या परिवारासाठी मदतीचे पॅकेज दिले त्यात मौलाना मसूद अजहर याला 14 कोटी रुपये दिले.

त्याचबरोबर बहावलपूर आणि मुरिदके इथली दहशतवादी केंद्रे पुन्हा जशीच्या तशी अत्याधुनिक उभारायचे काम सुरू केले. या दहशतवादी केंद्रांमध्ये स्विमिंग पूल पासून वेगवान इंटरनेट पर्यंत सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होत्या. तिथे विद्यार्थी भरतीच्या नावाखाली दहशतवाद्यांची चांगली बडदास्त राखली जात होती. दहशतवादाचे वेगवेगळे प्रकार शिकवले जात होते. पण भारताच्या हल्ल्यामध्ये या सुविधा नष्ट झाल्या म्हणून त्या पुन्हा उभारण्याचे काम पाकिस्तानने सुरू केले आहे.

– राजनाथ सिंह यांचा इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भूज मधल्या भाषणात त्यांनी यासंदर्भात गंभीर इशारा दिला. पाकिस्तान आपल्या टॅक्स पेयर्सचा पैसा दहशतवाद्यांसाठी वापरतोय. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाकडून मिळालेली मदत दहशतवादी केंद्रे पुन्हा उभी करण्यासाठी त्यात ओततोय. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने पाकिस्तानचे फंडिंग बंद करावे. कारण ते दहशतवादालाच फंडिंग करत आहेत, अशी मागणी आणि आरोप राजनाथ सिंह यांनी केला.

पाकिस्तानला त्यांनी प्रोबेशनवर ठेवले. पाकिस्तान या प्रोबेशन पिरीयड मध्ये सुधारला तर ठीक आहे नाहीतर त्या देशाला आता केली त्यापेक्षा जास्त मोठी शिक्षा करू, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला.

Pakistan rebuilding terror heavens

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात