Operation sindoor impact : आता पाकिस्तानी लष्करालाही भारतावर हल्ल्याची मुभा; पण हल्ला करताना पाकिस्तानी लष्कर कोणत्या करेल चुका??

नाशिक : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने operation sindoor मधून पाकिस्तानातल्या दहशतवादी केंद्रांवर मिसाईल हल्ले केले. पाकिस्तानातल्या 9 शहरांमधली 21 दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त केली. त्यासंदर्भात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सविस्तर माहिती दिली.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात नॅशनल सिक्युरिटी कमिटीची मीटिंग झाली. त्या मीटिंगच्या अध्यक्षस्थानी तिथले पंतप्रधान शहाबाज शरीफ होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराला भारतावर हल्ला करण्याची पूर्ण मुभा देण्यात आली. पाकिस्तानी लष्कराने वेळ आणि टार्गेट निवडावे. भारतावर हल्ला करावा. त्यासाठी पाकिस्तानचे सरकार आणि जनता पाकिस्तानी लष्कराच्या ठामपणे पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही नॅशनल सिक्युरिटी कमिटीने दिली. ही भारताच्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेअर्सच्या बैठकीची “कॉपी” ठरली. कारण पहलगाम मधला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेयर्सची बैठक घेतली. पहिल्या बैठकीतच भारतीय सैन्य दलाला पाकिस्तान मधल्या दहशतवादी केंद्रांवर कारवाई करायची पूर्ण मुभा दिली होती. त्यानुसारच भारतीय सैन्य दलाने “पीन पॉईंटेड प्रिसिजन स्ट्राईक” करून पाकिस्तान मधल्या 9 शहरांमधली 21 दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त केली. त्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय कायद्यातल्या right to respond या अधिकाराचा वापर केला. पण भारतीय सैन्य दलाने या कारवाईत कुठल्याच पाकिस्तानी सैन्य दलाच्या केंद्राला अथवा पाकिस्तानी सर्वसामान्य नागरिक केंद्रांना स्पर्श देखील केला नाही.

परंतु पाकिस्तानने मात्र या कारवाईत सर्वसामान्य नागरिक मारले गेल्याचा दावा केला. म्हणूनच पाकिस्तानी लष्कराला पाकिस्तानी सिक्युरिटी कमिटीने भारतावर हल्ला करायची पूर्ण मुभा दिली.

– पाकिस्तानी लष्कराची डोकेदुखी

पण पाकिस्तानी लष्कर नेहमीप्रमाणे भारतावर हल्ला करताना चूक करणार याची अनुभवाअंती खात्री पटली. कारण भारताने पाकिस्तानवर हल्ला करताना तिथल्या दहशतवादी केंद्रांना टार्गेट केले. पाकिस्तानी सैन्यदल किंवा नागरिकांना टार्गेट केले नाही. पण पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करायचे ठरवले तर ते कुठली टार्गेट्स निवडतील??, ही सगळ्यात गंभीर समस्या त्या देशापुढे उभे राहणार आहे. तिलक देवाशेर या संरक्षण तज्ञांनी हा मुद्दा विशेषत्वाने उचलून धरला.

कारण भारतात भारत सरकार पुरस्कृत कुठली दहशतवादी केंद्रे अस्तित्वातच नाहीत. अशा स्थितीत पाकिस्तानला भारतावर प्रत्युत्तर देण्याचा हल्ला करणार असेल, तर तो कोणत्या केंद्रांवर करावा??, याची चिंता पाकिस्तानी लष्कराला आहे आणि ही चिंता साधी सोपी नाही. कारण भारताच्या कुठलीही नागरी अथवा सैन्य दलाच्या केंद्रावर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल जरी हल्ला केला, तरी तो right to respond या सदरात मोडणारच नाही. तो आंतरराष्ट्रीय कायदा उल्लंघून दुसऱ्या देशावर केलेला हल्ला या सदरातच मोडेल. नेमकी त्याचमुळे भारताला थेट पाकिस्तान सैन्यावर किंबहुना थेट पाकिस्तान वरच “पीन पॉईंटेड प्रिसिजन स्ट्राईक” पेक्षा मोठा हल्ला करायची संधी मिळेल. त्यावेळी भारत कुठल्या आंतरराष्ट्रीय दबावाखाली हल्ला करण्याचा अधिकार गमावण्याची शक्यता नाही. उलट पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेला हल्ला भारतासाठी इष्टापत्ती ठरेल. नेमकी हीच पाकिस्तानी लष्कराची डोकेदुखी असेल.

Pakistan Military granted full authority to respond india airstrike

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात