Pakistan : पाकिस्तानचा आता नेपाळमार्गे भारतात घुसरखोरीचा प्रयत्न

Pakistan

पाकिस्तानी आणि बांगलादेशी, सीमेवर हाय अलर्ट जाहीर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Pakistan काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना ठार मारल्यानंतर, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर, पाकिस्तानने पराभव स्वीकारला आणि युद्धबंदीची घोषणा केली. यानंतरही पाकिस्तान आपल्या कुरापती थांबवल्या नाहीत.Pakistan

सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ३० ते ३५ संशयित नेपाळमध्ये पोहोचले आहेत आणि ते उत्तर प्रदेशातील बहराइच-नेपाळ सीमेवरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत.



एसएसबी अधिकाऱ्यांच्या मते, सुमारे दहा बांगलादेशी आणि सुमारे २५ किंवा त्याहून अधिक पाकिस्तानी भारतात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे, एसएसबी जवानांनी संपूर्ण खुल्या सीमा भागात सुरक्षा वाढवली आहे तसेच सीमेवर तपासणी वाढवली आहे. कोणत्याही पाकिस्तानी किंवा बांगलादेशी व्यक्तीला भारतात प्रवेश देऊ नये यासाठी सैनिक प्रयत्न करत आहेत.

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेवर तैनात असलेले एसएसबी सतर्क झाले आहे. एसएसबीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ३५ हून अधिक बांगलादेशी आणि पाकिस्तानी संशयित नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Pakistan is now trying to infiltrate into India through Nepal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात