वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत – पाकिस्तान संबंधांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर RSS ideology थेट दोषारोप केला आहे. त्याला केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे.Pakistan is a haven for terrorists; India’s scathing response to Imran Khan’s duplicates on RSSa
इम्रान खान यांना पुरते माहिती आहे, की दहशतवादाची पाळेमूळे पाकिस्तानात आहेत. पाकिस्तान तर दहशतवाद्यांसाठी स्वर्ग आहे. तिथे त्यांना पोसले जाते. RSS सर्वांशी सुसंवाद आणि सौहार्द राखण्यास शिकवते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर इम्रान खान यांनी झाडलेल्या दुगाण्या फिजूल आहे, अशी घणाघाती टीका कौशल किशोर यांनी केली.
तत्पूर्वी, इम्रान खान यांनी पाकिस्तानाने पाळलेल्या दहशतवाद्यांचा प्रश्नावर उत्तर देणे टाळले. तालिबान संदर्भातील प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले नाही. परंतु, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर RSS दोषारोप करून ते मोकळे झाले.
मध्य आणि दक्षिण आशिया परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इम्रान खान चाललेले असताना एएनआय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने त्यांना अडवून दहशतवाद आणि भारत – पाकिस्तान चर्चा हातात हात घालून चालू शकतात का, हा थेट प्रश्न विचारला.
#WATCH Pakistan PM Imran Khan answers ANI question, 'can talks and terror go hand in hand?'. Later he evades the question on whether Pakistan is controlling the Taliban. Khan is participating in the Central-South Asia conference, in Tashkent, Uzbekistan pic.twitter.com/TYvDO8qTxk — ANI (@ANI) July 16, 2021
#WATCH Pakistan PM Imran Khan answers ANI question, 'can talks and terror go hand in hand?'. Later he evades the question on whether Pakistan is controlling the Taliban.
Khan is participating in the Central-South Asia conference, in Tashkent, Uzbekistan pic.twitter.com/TYvDO8qTxk
— ANI (@ANI) July 16, 2021
त्यावर मागे वळून ते उत्तरले, की आम्ही म्हणजे पाकिस्तान तर किती वर्षे वाट पाहतोय की भारत आणि पाकिस्तान नागरी प्रशासनात उत्तम शेजाऱ्यासारखे राहिले पाहिजेत. पण आम्ही काय करणार दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये भारतातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी RSS ideology आडवी येते आहे.
एवढे बोलून इम्रान खान निघून गेले. पण तेवढ्यात तेथे छोटे नाट्यही घडले. दहशतवाद आणि तालिबान यांच्या बाबतचे प्रश्न विचारत एएनआयचा पत्रकार आणि कॅमेरामन इम्रान खान यांच्या मागे गेला. पण त्याच्या प्रश्नांनी उत्तरे देणे त्यांनी टाळले. इम्रान खान यांच्या सुरक्षा रक्षकांनी या पत्रकाराला आणि कॅमेरामनला अडविण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद तर म्हणाले देखील अब बस कर यार…!!
इम्रान खान यांच्या नेमक्या प्रश्नांना उत्तरे देण्याची टाळाटाळ ताश्कंदमध्ये, पाकिस्तानात आणि भारतात चर्चेचा विषय बनली आहे. आता तर केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी त्यांना खणखणीत प्रत्युत्तर देखील दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App