त्यांनी आपल्या इतिहासातून काहीही शिकलेले नाही, असा टोलाही लगावला. Pakistan failed in all nefarious attempts in the past PM Modi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज कारगिल विजय दिवस आहे. 26 जुलै 1999 रोजी टायगर हिलवर भारतीय योद्ध्यांनी तिरंगा फडकवला. त्यामुळे कारगिल युद्धात पाकिस्तानला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी मोदी म्हणाले की, कारगिलमध्ये आम्ही केवळ युद्ध जिंकले नाही तर आम्ही सत्य, संयम आणि ताकद दाखवली.
ते म्हणाले, “पाकिस्तानने यापूर्वी केलेले सर्व नापाक प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. पण पाकिस्तानने आपल्या इतिहासातून काहीही शिकलेले नाही. आज मी जिथून बोलतोय, तिथून दहशतवादाचे सूत्रधार माझा आवाज थेट ऐकू शकतात, मी दहशतवादाच्या समर्थकांना सांगू इच्छितो की त्यांचे नापाक इरादे कधीच यशस्वी होणार नाहीत, आमचे जवान दहशतवादाचा संपूर्ण ताकदीने पाडाव करतील आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल…”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘लडाख असो किंवा जम्मू-काश्मीर, भारत विकासाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा पराभव करेल. काही दिवसांत म्हणजे ५ ऑगस्टला कलम ३७० रद्द होऊन ५ वर्षे पूर्ण होतील. जम्मू-काश्मीर नव्या भविष्याविषयी बोलत आहेत, मोठ्या स्वप्नांबद्दल बोलत आहेत… लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पर्यटन क्षेत्रही वेगाने वाढत आहे, साडेतीन दशकांनंतर काश्मीरमध्ये सिनेमा हॉल उघडले आहे, श्रीनगरमध्ये पहिल्यांदा ताजियाची मिरवणूक काढण्यात आली, पृथ्वीवरील आपला स्वर्ग वेगाने शांतता आणि सौहार्दाकडे जात आहे…”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App