पहलगाम हल्ल्यानंतर सतत भारतविरोधात गरळ ओकत होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Pakistan Defense Minister पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांचे ‘एक्स’ अकाउंट भारतात बंदी घालण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ख्वाजा सतत विष ओकत होते. ते भारताविरुद्धही अनियमित विधाने करत होते. ख्वाजा आसिफ यांनी भारताकडून लष्करी हल्ल्याची भीती असल्याची कबुलीही दिली होती.Pakistan Defense Minister
सोमवारी आसिफ यांनी म्हटले होते की, भारताकडून हल्ला निश्चित आहे आणि तो कधीही होवू शकतो. भारताकडून हल्ल्याचा धोका लक्षात घेता, आम्ही आमच्या सुरक्षा दलांना बळकटी देण्यास सुरुवात केली आहे. या परिस्थितीत काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागतील आणि हे निर्णय घेतले जात आहेत.
दरम्यान, भारताने संयुक्त राष्ट्रांमध्येही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. ख्वाजा यांनी नुकतीच दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी पुरवल्याची कबुली दिली होती. त्यांनी एका मुलाखतीत कबूल केले की त्यांचा देश वर्षानुवर्षे दहशतवादाला पाठिंबा दिला.
भारताने याबाबत शेजारील पाकिस्ताना कडक प्रश्न विचारले आणि जागतिक व्यासपीठावर त्यांचा दुष्ट चेहरा उघड केला. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी राजदूत योजना पटेल म्हणाल्या की, ही कबुली आश्चर्यकारक नाही. यामुळे पाकिस्तान एक बदमाश देश म्हणून उघड झाला आहे. जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App