विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या भारताला युद्धाच्या पोकळ धमक्या; पण त्या देशात फक्त 96 तास पुरे एवढाच दारुगोळ्याचा साठा!!, अशी पाकिस्तानची दारुण अवस्था आहे आणि ही अवस्था भारताने कुठली कारवाई केली म्हणून झालेली नसून खुद्द पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी स्वतःच्या नसत्या ताकदीच्या भ्रमात केलेल्या वेगवेगळ्या करारांनी त्या देशावर आणली आहे. Pakistan
पाकिस्तानच्या दारुगोळ्याच्या तुटवड्याची कहाणी अजब आहे. असीम मुनीर नावाच्या जिहादी जनरलच्या आधी जे पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख होते, त्या कमर जावेद बाजवा यांनी पाकिस्तानी दारूगोळ्याच्या भीषण तुटवड्यावर त्या देशातल्या राज्यकर्त्यांना पूर्वीच इशारा दिला होता. पाकिस्तानी ॲम्युनिशन फॅक्टर्यांमधला मटेरियल रसद पुरवठा वाढवा, अन्यथा पाकिस्तानला आवश्यक असणाऱ्या दारूगोळ्याचे तिथे उत्पादन होऊ शकणार नाही, असे कमर जावेद बाजवा म्हणाले होते. पण पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. पाकिस्तानी अम्युनिशन फॅक्टरी मधला मटेरियल रसद पुरवठा वाढवला नाही. त्यामुळे तिथले दारुगोळ्याचे उत्पादन थंडावले.
पण हे सगळे कमी पडले म्हणून की काय पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी राणा भीमदेवी थाटात बाकीच्या देशांना शस्त्रास्त्र आणि दारूगोळा पुरवण्याचे करार करून ठेवले. त्यांनी युक्रेनसकट अन्य छोट्या मोठ्या देशांना दारूगोळा विकला. पण दारूगोळाही हातचा गेला आणि त्याचे पैसे देखील त्या देशांनी पाकिस्तानला अजून दिले नाहीत, अशी पाकिस्तानची अवस्था बिकट झाली. सध्या पाकिस्तानकडे फक्त 96 तास पुरेल एवढाच दारूगोळ्याचा साठा उरल्याची बातमी ANI या विश्वासार्ह वृत्तसंस्थेने दिली. या दारूगोळ्याच्या साठ्यात 155 एमएम आर्टीलरी शेल्स, बीएम 21 साठी लागणारे 122 एमएम रॉकेट यांचा समावेश आहे. हा दारूगोळा पाकिस्तानने युक्रेनला विकला. त्यामुळे भारताशी संघर्ष करायची वेळ आली असताना त्या देशात या दारूगोळ्याचा तुटवडा निर्माण झाला.
एकीकडे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या मंत्र्यांनी, राजदूतांनी भारताबरोबर अणुयुद्ध करायच्या धमक्या दिल्या, पण अणुयुद्ध तर सोडाच, पण तोफा, बंदुका आणि मिसाईल सिस्टीम यांनी भारताबरोबर युद्ध खेळायची वेळ आली, तर आवश्यक असणारा दारुगोळा पाकिस्तान कडे शिल्लक नसल्याचे वस्तुस्थिती समोर आली आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांची भंबेरी उडाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App