पाकिस्तानला भारताशी करायचाय composite dialogue, पण त्यामध्ये 370 आणि सिंधू जल करार घुसवायचा विषारी डाव!!

नाशिक : Operation sindoor दरम्यान पाकिस्तानातल्या अण्वस्त्रांना धक्का लागल्याबरोबर पाकिस्तान भित्र्या कुत्र्यासारखा दोन पायाचे पुढे घालून शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडे धावला. भारताने आपले मिशन संपूर्ण पार पाडल्यानंतर ऑपरेशन सिंदूरची कारवाई तात्पुरती स्थगित केली. त्यामुळे पाकिस्तानला थोडा श्वास घ्यायला मोकळीक मिळाली. पण ही मोकळीक मिळताच पाकिस्तानच्या सैतानी डोक्यात नवे नवे विषारी डाव शिजायला लागले.

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांच्या तोंडून असाच एक डाव बाहेर आला. पाकिस्तानी संसदेचे वरिष्ठ सभागृह सेनेट मध्ये बोलताना त्यांनी पाकिस्तानला भारताशी composite dialogue सुरू करायचा आहे, असे वक्तव्य केले. दार यांच्या वक्तव्यातली भाषा फारच diplomatic म्हणजे राजनैतिक वर्तुळात शोभणारी होती, पण प्रत्यक्षात त्यांच्या पुढच्याच वक्तव्यातून पाकिस्तानी सैतानी डोक्यातले विषारी विचार बाहेर आले. भारताशी सुरू करायच्या composite dialogue मध्ये केवळ शस्त्रसंधी हा विषय नसून त्या पलीकडे जाऊन राजनैतिक पातळीवर काश्मीरचा मूळ प्रश्न, 370 कलम आणि सिंधू जल करार यांचा समावेश करायचा आहे, असे इशाक दार म्हणाले. दार यांच्या वक्तव्यातला खरा अर्थ समजून घेतल्यावर पाकिस्तानी सैतानी डोक्यातले विषारी विचार नेमके काय??, हे समजून येईल.

वास्तविक उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा करण्याची स्वतःची चौकट ठरवून घेतली आणि त्या चौकटीनुसार पाकिस्तानशी संबंध आणि चर्चा करण्याची मर्यादा घालून घेतली. या मर्यादेत भारत पाकिस्तानशी फक्त दहशतवादाचे कायमचे निर्मूलन, पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताला परत करणे या दोनच मुद्द्यांवर चर्चा करणार असे 2018 पासूनच जाहीर केले होते. पहलगाम हल्ला आणि त्यानंतरचे ऑपरेशन सिंदूर या पार्श्वभूमीवर तर भारताने आपली भूमिका अधिक कठोर म्हणजे assertive केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या ताज्या वक्तव्यांमधून भारताच्या या भूमिकेवर पुन्हा शिक्कामोर्तब केले.



या परिप्रेक्षात पाकिस्तानच्या उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांचे composite dialogue चे वक्तव्य समोर आले. याचा अर्थच पाकिस्तानला आता सैन्य कारवाई बरोबरच राजनैतिक पातळीवर देखील भारताची कुरापत काढायची आहे. 370 आणि सिंधू जल करार हे मुद्दे मुद्दामून चर्चेच्या कक्षेत आणायचेत. यापैकी 370 कलम हा तर मुद्दा भारताने केव्हाच कालबाह्य ठरवलाय तरी देखील भारताने काश्मीर मधून 370 कलम रद्द करण्याची भूमिका पाकिस्तानने कधी मान्यच केली नाही, असे इशाक दार यांनी सेनेट मध्ये मध्ये जाहीर केले. त्यानंतर लगेच त्यांनी सिंधू जल कराराचा मुद्दा composite dialogue मध्ये घुसवला. त्यामध्ये “मानवता” शब्द वापरला. एखाद्याचे पाणी तोडणे ही “मानवता” नाही. भारताने सिंधू जल करार रद्द करून अमानवी कृत्य केले. हा करार कुणा एकट्याला मोडता येणार नाही किंवा स्थगित करता येणार नाही, अशी तरतूद त्या करारातच केली आहे, असा आरोप आणि दावा इशाक दार यांनी केला.

 सिंधू जल करार रद्द साठी पाकिस्तान उतावीळ

पण इशाक दार यांच्या या वक्तव्यातले between the lines वाचल्यावर काही वेगळेच सत्य समोर आले. वास्तविक पाकिस्तानला भारताशी 370 वगैरे दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावर चर्चा करायची खरी इच्छाच नाही. कारण भारत आता “जुना भारत” उरलेला नसून हा “नवा भारत” आहे, हे त्यांच्या राज्यकर्त्यांना पुरते कळून चुकलेय, पण composite dialogue सारखे “जड शब्द” वापरून पाकिस्तानला भारताबरोबर फक्त सिंधू जल करार या विषयावर चर्चा करायचीय. कारण पाकिस्तानचे पाणी तुटल्याबरोबर तिथल्या राज्यकर्त्यांना खरी जागा आलीय. पाकिस्तानचे कृषी उत्पन्न 2.5 % घटेल, असा अंदाज तिथल्या शहबाज शरीफ सरकारने खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच जाहीर करून टाकलाय. कराची, मुलतान, लाहोर या मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांना आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागतेय. पाकिस्तानातल्या नद्या आणि कालवे आटत चाललेत. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याचे गंभीर परिणाम वाढत चाललेत. या परिणामांना तोंड देणे शक्य नाही हे लक्षात घेऊनच पाकिस्तानने composite dialogue या गोड गुलाबी राजनैतिक नावाखाली भारताशी चर्चा करण्यासाठी डाव टाकलाय. कसेही करून सिंधू जल करारावरची स्थगिती भारताकडून रद्द करून घ्यायची यासाठी पाकिस्तानी राज्यकर्ते प्रचंड उतावीळ झालेत, कारण पाण्याचा दुसरा कुठलाही स्त्रोत पाकिस्तानात उपलब्ध नाही. सिंधू जल करार स्थगित करून भारताने पाकिस्तानचे नाक दाबलेय म्हणूनच सैतानी डोक्याच्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे तोंड उघडलेय. पण हे उघडपणे सांगता येणार नाही म्हणून ते त्यांनी composite dialogue या गोड गुलाबी नावाने सांगून टाकलेय. पण पाकिस्तानचा हा विषारी डाव न समजण्या इतपत भारतीय राज्यकर्ते आता दूधखुळे उरलेले नाहीत!!

Pakistan calls for composite dialogue with India, but it has venomous intention in mind

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात