पाकिस्तान आणि चीनवर एकाच वेळी ठेवता येणार नजर, पंजाबमध्ये एस-४०० क्षेपणास्त्र युनिट तैनात

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकेने नाराजी व्यक्त करूनही त्याला भिक न घालता मोदी सरकारने रशियाकडून घेतलेली एस-४०० ही क्षेपणास्त्र प्रणाली भारतात दाखल झाली आहे.भारतासोबत सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शत्रूंवर एकाच वेळी नजर ठेवण्यासाठी भारताने एस-४०० क्षेपणास्त्र युनिटला पंजाबमध्ये तैनात केले आहे.Pakistan and China can be monitored simultaneously, S-400 missile unit deployed in Punjab

पंजाबमध्ये वायुसेनेच्या पाचपैकी एका तळावर ही यंत्रणा सध्या तैनात करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सीमेपासून हे तळ सर्वात जवळ आहे. दोन्ही शत्रूंच्या कोणत्याही हल्ल्याला उधळून लावण्यास सक्षम असलेली ही क्षेपणास्त्र यंत्रणा भारताने रशियाकडून विकत घेतली आहे.



४०० किलोमीटर अंतरावरून केलेल्या कोणत्याही हल्ल्याला निष्क्रिय करण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे. त्यामुळे शत्रूची विमाने आणि क्रूझ क्षेपणास्त्रांना ४०० किलोमीटर अंतरावरूनच रोखणे भारताला शक्य आहे. या यंत्रणेसाठी वायुसेनेच्या अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

दक्षिण आशियामध्ये यामुळे भारताचे वजन वाढणार आहे. भारताने सुमारे पाच अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम एस-४०० साठी मोजली आहे. एस-४०० युनिटमध्ये ४००, २५०, १२० आणि ४० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकणाऱ्या चार वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. एकाच वेळी १०० ते ३०० लक्ष्यांना भेदण्यात ही यंत्रणा सक्षम आहे.

Pakistan and China can be monitored simultaneously, S-400 missile unit deployed in Punjab

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात