भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Pakistan सध्या पाकिस्तानवर वॉटर स्टाइक आणि पॉलिटकल स्टाइक झाला आहे आणि पाकिस्तानची भीतीही समोर आली आहे. मात्र पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, २४ तासांत दुसऱ्याता नियंत्रण रेषेवर गोळीबार केला गेला आहे. तर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.Pakistan
दहशतवादाविरुद्धच्या नवीन भारताच्या आक्रमक रणनीतीचा विचार करता, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी काहीतरी मोठी योजना आखण्यात आली आहे असे मानले जाते. दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी खुल्या व्यासपीठावर दिलेला इशारा हेच दर्शवित आहे आणि कदाचित यामुळेच पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे.
पाकिस्तानमध्ये सर्वपक्षीय बैठका सतत होत आहेत. पाकिस्तानला भीती आहे की भारत इथून पुढे गप्प बसणार नाही आणि पुलवामामध्ये याची साक्ष दिली आहे, जेव्हा एअर स्टाइक करण्यात आला होता आणि त्याशिवाय बांदीपोरामध्ये लष्कर ए तोबाच म्होरक्या ज्या पद्धतीने मारला गेला होता.
त्यानंतर, पाकिस्तानला समजले आहे की भारत येथे गप्प बसणार नाही. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी आदिलचे घर अनंतनागमध्ये उडवून देण्यात आले. त्याच वेळी, आणखी एक दहशतवादी आसिफ शेखचा बेकायदेशीर लपण्याचा परिसरही उद्ध्वस्त करण्यात आला. हा फक्त पहलगामच्या सूडाचा ट्रेलर आहे. यावेळी दहशतवादी भूमी असलेल्या पाकिस्तानला कोणत्या प्रकारची वागणूक मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण जग पंतप्रधान मोदींचे शब्द ऐकत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App