विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताचा विरोधात वापरण्यासाठी खरेदी केलेली चिनी शस्त्रे बोथट ठरली, पाकिस्तानी सेना हात पसरत अमेरिकेच्या दारात पोहोचली. पाकिस्तानचे स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे diplomatic lunch खाऊन आल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू अमेरिकेला पोहोचले. तिथे त्यांनी अमेरिकन सैन्य दलाच्या प्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या. अमेरिकेने पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे द्यावीत, अशी मागणी केली. चिनी बनावटीच्या शस्त्रांवर अवलंबून राहण्याची चूक कबूल केली. f16 विमानांपासून ते एअर डिफेन्स सिस्टीम पर्यंत सगळ्या शस्त्रांची मागणी केली. याला त्यांनी अमेरिका – पाकिस्तान संरक्षण मजबुतीकरणाचे नाव दिले. Pak air chief
Operation sindoor दरम्यान भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या हल्ल्यामध्ये चिनी बनावटीची एअर डिफेन्स सिस्टीम फेल गेली. चिनी क्षेपणास्त्रे देखील कामाला आली नाहीत. त्यामुळे पाकिस्तानी संरक्षण उघड्यावर पडले. भारताने वेळीच हल्ले थांबविले अन्यथा मोठी हानी झाली असती याची जाणीव पाकिस्तानी सैन्य दलाला झाली. त्यामुळे चिनी बनावटीच्या बोगस शस्त्रांवर अवलंबून राहणे शक्य नाही हे लक्षात आल्याबरोबर पाकिस्तानचे लष्करी राज्यकर्ते अमेरिकेच्या दारात गेले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर याला diplomatic lunch दिले त्यामागे त्यांचा व्यापारीच हेतू होता पाकिस्तानने चिनी बनावटीची शस्त्रे वापरणे सोडून द्यावे अमेरिकन शस्त्रे विकत घ्यावीत हा त्यामागचा खरा हेतू होता. तो काही प्रमाणात साध्य झाला.
पाकिस्तानने अमेरिकेकडे f16 विमानांचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी पैसा आणि तंत्रज्ञान मागितले. त्याचबरोबर हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे विकत घ्यायची तयारी दाखविली. अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम मागितली. यापैकी अमेरिका जे देईल ते स्वीकाराची तयारी दाखविली. चिनी बनावटीच्या शस्त्रांवर अवलंबून राहणे चूक ठरल्याची कबुली अमेरिकन राज्यकर्त्यांच्या समोर दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App