विशेष प्रतिनिधी
पुणे : Pahalgam terrorist attack जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. तत्पूर्वी, मुंबईत पार्थिव आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली होती.Pahalgam terrorist attack
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे कर्वेनगर येथे जगदाळे कुटुंबाला भेटण्यासाठी आले आहेत. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. शरद पवार यांच्यासमोर जगदाळे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले.
कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्यांना अश्रू अनावर झाले आहेत. पुणे एअरपोर्टवर गुरुवारी पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहचल्या त्यावेळी मंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मृतांची नावे
1) अतुल मोने – डोंबिवली 2) संजय लेले – डोंबिवली 3) हेमंत जोशी- डोंबिवली 4) संतोष जगदाळे- पुणे 5) कौस्तुभ गणबोटे- पुणे 6) दिलीप देसले- पनवेल
हे झाले जखमी
1) एस बालचंद्रू 2) सुबोध पाटील 3) शोबीत पटेल
दोघांत गेल्या 25 वर्षांपासून मैत्री
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या दोघांना त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यासमोर अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केले. या दोघांत गेल्या 25 वर्षांपासून मैत्री होती आणि फरसाणच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यात अधिक जवळीक निर्माण झाली होती. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मैत्रीचा करुण शेवटही एकत्रच झाला. जगदाळेंचे एकुलत्या एक एमबीए झालेल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नाचे, तर गनबोटे यांचे नातवाचे बारसे करण्याचे स्वप्न अधुरे राहिले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
ढगफुटीमुळे वैष्णोदेवीऐवजी काश्मीर पर्यटनाला गेले होते
संतोष पत्नी प्रगती व मुलगी आसावरी आणि कोस्तुभ गनबोटे व त्यांची पत्नी संगीता असे 5 जण शनिवारी रात्रीच्या विमानाने काश्मीरला 10 दिवसांच्या दौऱ्यावर दिल्लीला गेले होते. त्यांचा वैष्णोदेवीला जाण्याचा संकल्प होता. परंतु ढगफुटीमुळे त्यांनी काश्मीर खोऱ्यात फिरावयास जाण्याचा निर्णय घेतला होता. अतिरेक्यांनी जगदाळेंच्या डोक्यात, पाठीत व मानेला अशा तीन तर गनबोटेंना पोटाला व डोक्याला दोन गोळ्या घातल्या. दोघे मित्र रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिले. डोळ्यादेखत दोघांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याने कुटुंबीय भयभीत झाले व मदतीसाठी याचना करत राहिले. परंतु घटनेनंतर बराच वेळ मदत मिळू शकली नाही व भारतीय लष्कर नंतर आल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. रुग्णालयात नेल्यावर त्यांचा काहीच वेळात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगताना संतोष यांचे भाऊ अजय यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App