नाशिक : पहलगाम मधला हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून आपापल्या राज्यातले पाकिस्तानी नागरिक शोधून काढून त्यांना परत त्यांच्या देशात पाठविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार विविध राज्यांमध्ये कारवाया सुरू झाल्या. महाराष्ट्रात फडणवीस सरकारने पाकिस्तानी नागरिकांची मोजणी केली त्यामध्ये बरेच धक्कादायक सत्य बाहेर आले. महाराष्ट्रात 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले असून ते त्यापैकी सर्वाधिक नागरिक मुंबई किंवा किनारी प्रदेशात आढळले नसून महाराष्ट्राची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर नागपूरात सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक आढळून आले. नागपुरात 2458 पाकिस्तानी नागरिक आढळले असून त्यांचे आयडेंटिफिकेशन सुरू असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एबीपी माझा या चॅनलला दिली.
महाराष्ट्रातल्या 48 शहरांमध्ये आत्तापर्यंत 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले. त्यात नागपूरचा जसा पहिला क्रमांक लागला, तसा ठाण्याचा दुसरा क्रमांक लागला ठाण्यात 1106 पाकिस्तानी नागरिक आढळले, पण दहशतवाद्यांनी वारंवार टार्गेट केलेल्या मुंबईत मात्र फक्त 14 नागरिक आढळून आले. या आकड्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 5023 पाकिस्तानी नागरिकांपैकी फक्त 51 जणांकडे वैध कागदपत्रे आढळली असून तब्बल 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती स्वतः योगेश कदम यांनीच दिली. 107 पाकिस्तानी नागरिकांचा पोलीस किंवा अन्य तपास यंत्रणांना अद्याप तरी तपास लागलेला नाही, असे योगेश कदम म्हणाले. या खेरीज जळगावात 405 पाकिस्तानी नागरिक आढळल्याची बातमी अलग आहे.
सार्क व्हिसा, शॉर्ट टाईम व्हिसा मिळवून भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडायला सांगण्यात आले होते. परंतु ती प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. संबंधितांचे आयडेंटिफिकेशन अजून सुरू असून काही वैद्यकीय उपचार घेणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना दोन दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
पण या सगळ्यातली धक्कादायक आणि धोकादायक बाब अशी की एक तर 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झालेत. शिवाय नागपूर सारख्या किनाऱ्यापासूनच्या दूरच्या शहरांमध्ये सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक आढळून आले आहेत. या पाकिस्तानी नागरिकांचा नागपूरशी संबंध काय?? त्या शहरात त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार अचानक कसे काय वाढले??, असे सवाल तयार झाला आहे. 2458 पाकिस्तानी नागरिक एकाच झुंडीने तर नागपूर शहरात आले नसतील. ते टप्प्याटप्प्यानेच नागपुरात आले असतील, तर तर ते नेमके केव्हा आले??, कसे आले??, सध्या ते कुठे राहत आहेत??, हे सवाल देखील गंभीर आहेत. काही विशिष्ट मोडस ऑपेरेंडीतून नागपूर शहरात पाकिस्तानी नागरिकांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार टप्प्याटप्प्याने वाढविण्यात तर आले नाहीत ना??, याविषयी दाट संशय वाढला आहे.
मुंब्रा, मालेगाव, भिवंडी या मुस्लिम बहुल शहरांमध्ये अद्याप पाकिस्तानी नागरिकांची मोजणी झाली की नाही, याविषयी फडणवीस सरकारने अद्याप तपशील जाहीर केलेला नाही. पण तरी देखील पाकिस्तानी नागरिक मोजणीच्या पहिल्याच टप्प्यात इतर कुठल्याही शहरांपेक्षा नागपूर सारख्या शांत आणि सलोख्याच्या शहरात सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक आढळून आल्याने एकूणच पाकिस्तानी इकोसिस्टीमच्या मोडस ऑपरेंडी विषयीच्या संशयात भर पडली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App