विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर “गायब” झालाय. त्याने आपले कुटुंबीय परदेशात पाठवण्याची देखील बातमी आली. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI ने मात्र प्रेस रिलीज मध्ये असे मुनीरला रणगाड्यावर उभा दाखविला.
असीम मुनीर याने पाकिस्तान ओव्हरसीज कॉन्फरन्स मध्ये भारत विरोधी भाषण केल्यानंतर पहलगामचा हल्ला झाला. भारताने सिंधू जल करार स्थगित केला. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायची तयारी चालवली. या पार्श्वभूमीवर सर्जिकल स्ट्राइक किंवा एअर स्ट्राइक होईल या भीतीने असीम मुनीर याने त्याच्या कुटुंबीयांना परदेशात पाठवले. बाकीच्या बहुतेक नेत्यांनी देखील तेच केले. पण भारताला पोकळ तोंडी धमक्या देणे सुरू ठेवले.
पण याच दरम्यान असीम मुनीर स्वतःच गायब झाल्याची बातमी आली. त्यामुळे पाकिस्तानी फौजांचे मनोधैर्य खचले. आता ते खचलेले मनोधैर्य उंचावण्यासाठी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI ने प्रेस रिलीज काढून असीम मुनीर हा रणगाड्यावर उभा राहून पाकिस्तानी सैन्याला संबोधित करत असल्याचे दाखविले. त्याने म्हणे मांगला भागात पाकिस्तानी लष्कराच्या सरावाच्या ठिकाणाला भेट दिली. तिथल्या सैनिकांना संबोधित केले. भारताने कुठलेही दु:साहस केले, तर पाकिस्तानी लष्कर भारताला तोडीस तोड उत्तर द्यायला समर्थ असल्याचे असीम मुनीर याने म्हटल्याचे त्या प्रेस रिलीज मध्ये सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App