पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसासह 3 दहशतवादी ठार; ऑपरेशन महादेवअंतर्गत कारवाई

वृत्तसंस्था

श्रीनगर : ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्याने सोमवारी श्रीनगरच्या लिडवास भागात लपलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले. चिनार कॉर्प्सने X वर हे वृत्त दिले.

ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा देखील होता. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की मारला गेलेला दहशतवादी हाशिम मुसा होता.

इतर दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. उर्वरित दोन दहशतवाद्यांपैकी एकाचा २०२४ मध्ये सोनमर्ग बोगदा प्रकल्पावरील हल्ल्यात सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.

दहशतवाद्यांकडून अमेरिकन एम४ कार्बाइन, एके-४७, १७ रायफल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. काही इतर संशयास्पद वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत. मंगळवारी लष्कराकडून ऑपरेशन महादेवची माहिती दिली जाऊ शकते.

लष्कराच्या म्हणण्यानुसार, सकाळी ११ वाजता गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर लिडवासमध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान, दुरून दोनदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या भागात सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे.



एका आठवड्यापूर्वी मिळाली होती दहशतवादी लपल्याची माहिती

संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच दहशतवाद्यांनी चिनी अल्ट्रा कम्युनिकेशन सेट पुन्हा सक्रिय केला. तेव्हा सुरक्षा दलांना एका आठवड्यापूर्वी श्रीनगरच्या दाचीगाम जंगलात अतिरेकी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली. आज सकाळी ११:३० च्या सुमारास, २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ४ पॅरा युनिटच्या सैनिकांच्या तुकडीने प्रगत उपकरणांचा वापर करून दहशतवाद्यांचे ठिकाण शोधून काढले आणि तिथे उपस्थित असलेल्या तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारले.

२२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता आणि १६ जण गंभीर जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारे निवडकपणे लक्ष्य केले होते. ही घटना पहलगाम शहरापासून ६ किमी अंतरावर असलेल्या बैसरन खोऱ्यात घडली.

हल्ल्याच्या तपासादरम्यान तीन दहशतवाद्यांची नावे समोर आली

हल्ल्यानंतर केलेल्या तपासात तीन दहशतवाद्यांची नावे उघड झाली. २४ एप्रिल रोजी अनंतनाग पोलिसांनी ३ रेखाचित्रे प्रसिद्ध केली. तिन्ही दहशतवाद्यांची नावे अनंतनागचा आदिल हुसेन ठोकर, हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली उर्फ तल्हा भाई अशी आहेत. मुसा आणि अली हे पाकिस्तानी आहेत. मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये कमांडो होता. त्यांच्यावर प्रत्येकी २० लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे.

एनआयएने अटक केलेल्या दोन आरोपींनी या तीन दहशतवाद्यांची नावे उघड केली आहेत की इतर काही दहशतवाद्यांची हे सध्या स्पष्ट झालेले नाही.

Pahalgam Attack Mastermind Hashim Musa Among 3 Terrorists Killed in Operation Mahadev

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात