दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदतही केली होती.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Pahalgam attack जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याच्या तपासात एक मोठा खुलासा समोर आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) तपासादरम्यान असे पुरावे मिळाले आहेत, की या हल्ल्यात पाक-पुरस्कृत दहशतवाद्यांना स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर (ओजीडब्ल्यू) किंवा आतल्या व्यक्तीने मदत केली होती.Pahalgam attack
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आतल्या व्यक्तीने दहशतवाद्यांना पर्यटकांचे स्थानच सांगितले नाही तर हल्ल्यानंतर त्यांना पळून जाण्यास मदतही केली. या भयानक दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला, त्यापैकी बहुतेक पर्यटक होते. या दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. हा दहशतवादी हल्ला २२ एप्रिल रोजी पहलगाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बैसरन व्हॅलीमध्ये झाला.
तपास यंत्रणांना या भागातून दोन संशयास्पद सिग्नल मिळाले आहेत, जे एका विशेष ‘अल्ट्रा-स्टेट कम्युनिकेशन सिस्टम’शी जोडलेले आहेत. या तंत्रज्ञानामुळे मोबाईल डिव्हाइस सिम कार्डशिवाय ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल करू शकते किंवा संदेश पाठवू शकते. ज्या भागात हे सिग्नल मिळाले त्या भागाची कसून तपासणी करण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे. शोध सुरू असताना, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांसह एनआयए पथके जंगल भागात तैनात आहेत.
घटनेच्यावेळी पर्यटकांनी काढलेल्या व्हिडिओंमध्ये दिसणाऱ्या अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे यासोबतच, तपास संस्था कॉल रेकॉर्ड, बँक डिटेल्स आणि इतर डिजिटल बॅकअप डेटाची कसून चौकशी करत आहेत. सुरुवातीला तपासाची व्याप्ती १०-१२ किलोमीटरपर्यंत मर्यादित होती, परंतु आता ती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App