पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
कारवार : Tulsi Gowda ट्री मदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या तुलसी गौडा यांचे सोमवारी निधन झाले. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक मान्यवर व्यक्तींसमोर अनवाणी पायाने आणि आदिवासी पोशाखात त्यांना पद्मश्री पुरस्कार स्वीकारला . तुलसी गौडा या हलक्की समाजाच्या होत्या. त्या ८६ वर्षांच्या होत्या आणि वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी त्रस्त होत्या.Tulsi Gowda
उत्तरा कन्नड जिल्ह्यातील अंकोल तालुक्यातील हन्नाली या त्यांच्या मूळ गावी त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आणि त्या पर्यावरण रक्षणासाठी मार्गदर्शक प्रकाश राहतील असे सांगितले. विशेष म्हणजे तुलसी गौडा यांनी लहान वयातच वनविभागाच्या रोपवाटिकेत काम करायला सुरुवात केली. त्या लहानपणी अनेकदा रोप वाटिकेत जात असत.
त्यांना पद्मश्रीशिवाय त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांना झाडे लावण्याची खूप आवड होती. हे काम त्या मोठ्या आनंदाने करत असे. अंकोला आणि आसपासच्या परिसरात हजारो झाडे लावण्यात आली आहेत, त्याचे श्रेय तुलसी गौडा यांना जाते. त्यांनी लावलेली अनेक रोपटे वर्षानुवर्षे बरीच मोठी झाली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App