विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जोगम्मा घराण्याच्या ट्रान्सजेंडर लोकनृत्यांगणा आणि कर्नाटक जनपद अकादमीच्या पहिल्या ट्रान्सवुमन मथा बी मंजम्मा जोगती यांनी मंगळवारी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं.आलं.२०१९ मध्ये, मंजम्मा जोगती कर्नाटक जनपद अकादमीच्या पहिल्या ट्रान्सजेंडर अध्यक्षा झाल्या.
#WATCH | Transgender folk dancer of Jogamma heritage and the first transwoman President of Karnataka Janapada Academy, Matha B Manjamma Jogati receives the Padma Shri award from President Ram Nath Kovind. pic.twitter.com/SNzp9aFkre — ANI (@ANI) November 9, 2021
#WATCH | Transgender folk dancer of Jogamma heritage and the first transwoman President of Karnataka Janapada Academy, Matha B Manjamma Jogati receives the Padma Shri award from President Ram Nath Kovind. pic.twitter.com/SNzp9aFkre
— ANI (@ANI) November 9, 2021
राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मंजम्मा जोगती यांनी पारंपारिक पद्धतीने राष्ट्रपतींना आशीर्वाद दिले. याचा व्हिडिओ एएनआयनं ट्विट केला आहे.
त्यांनी विविध स्त्री देवतांच्या स्तुतीसाठी इतर कला प्रकार, जनपद गाणी, कन्नड भाषेतील सॉनेटमध्येही प्रभुत्व मिळवले.या कामगिरीसाठी मंजम्मा यांना २०१० मध्ये कर्नाटक राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2006 मध्ये त्यांना कर्नाटक जनपद अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि २०१९ मध्ये त्यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासह, त्या या पदावर विराजमान होणार्या पहिल्या ट्रान्सजेंडर ठरल्या.
७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत सरकारने नृत्य क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली होती.
कोण आहेत मंजम्मा जोगती?
जोगती नृत्य, जनपद गीत आणि इतर कलाप्रकार टिकवून ठेवण्यासाठी मंजम्मा जोगती या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये जोगती नृत्य आणि जनपद गीतांची परंपरा अजूनही सुरु आहे.
मंजम्मा जोगती यांना सन २००६ मध्ये कर्नाटकातील जनपद अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. त्याचबरोबर सन २०१० मध्ये कर्नाटक सरकारच्यावतीनं त्यांचा वार्षिक कन्नड राज्योत्सव पुरस्कारानं गौरवही करण्यात आला आहे. ही कला आणि संस्कृती शिकून तिचं संवर्धन करण्याचं आवाहन त्यांनी आपल्या समाजाला केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App