P Chidambaram : तहव्वुर राणाला भारतात आणल्याबद्दल पी चिदंबरम यांनी केले मोदी सरकारचे केले अभिनंदन

P Chidambaram

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक तहव्वुर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : P Chidambaram मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या १६ वर्षांनंतर, भारताला अमेरिकेतून दहशतवादी तहव्वुर राणाला आणण्यात यश आले आहे. दरम्यान, माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दहशतवादी तहव्वुर राणाच्या यशस्वी प्रत्यार्पणाबद्दल केंद्र सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात या प्रक्रियेला गती मिळाली.P Chidambaram

चिदंबरम यांच्या मते, यूपीए सरकारमधील तत्कालीन मंत्री सलमान खुर्शीद आणि परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांनी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी असेही म्हटले की मी भाजप प्रवक्त्यांना गांभीर्याने घेत नाही. मी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनाची वाट पाहत आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक तहव्वुर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले.



माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की, ही प्रक्रिया २००९ मध्ये सुरू झाली. त्यानंतर, २०११ मध्ये अमेरिकन गुप्तचर संस्थांनी तहव्वुर राणा याची ओळख पटवल्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली. दीर्घ आणि कठीण लढाईनंतर राणाला भारतात परत आणल्याबद्दल मी परराष्ट्र मंत्रालय, गुप्तचर संस्था आणि एनआयएचे अभिनंदन करतो.

P Chidambaram congratulates Modi government for bringing Tahawwur Rana to India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात