विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: P. Chidambaram वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृह मंत्री पी. चिदंबरम यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील ऑपरेशन ब्ल्यू स्टार हा चुकीचा निर्णय होता असे म्हणत दिलेल्या वक्तव्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. P. Chidambaram
हिमाचल प्रदेशातील कसौली येथे झालेल्या खुशवंत सिंग लिटरेरी फेस्टिव्हलमध्ये बोलताना चिदंबरम म्हणाले — “ब्ल्यू स्टार हा सुवर्ण मंदिर परत मिळविण्याचा चुकीचा मार्ग होता. काही वर्षांनंतर आम्ही दाखवून दिले की, सेना न वापरता मंदिरातील अतिरेक्यांना बाहेर काढता येते. ब्ल्यू स्टार हा चुकीचा निर्णय होता आणि इंदिरा गांधींनी त्या चुकीची किंमत जीव देऊन चुकवली.” P. Chidambaram
चिदंबरम यांनी पुढे स्पष्ट केले की, हा निर्णय केवळ इंदिरा गांधींचा नव्हता, तर सेना, पोलिस, गुप्तचर संस्था आणि नागरी प्रशासन यांचा एकत्रित निर्णय होता. P. Chidambaram
चिदंबरम यांच्या वक्तव्याला शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती (SGPC) कडून पाठिंबा मिळाला. सरचिटणीस भाई गुरचरणसिंह ग्रेवाल म्हणाले —चिदंबरम अगदी बरोबर आहेत. ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीचा होता आणि तो टाळता आला असता. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्यामुळे अंतिम निर्णय त्यांचाच होता. सुरुवातीपासून काँग्रेसने या प्रकरणात सत्य दडवले. आता जर चिदंबरम यांनी प्रामाणिकपणे सत्य मांडले असेल, तर आम्ही त्यांचे स्वागत करतो.”
मात्र, काँग्रेसमध्ये मात्र नाराजीचा स्फोट झाला आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी टीका करत विचारले “५० वर्षांनंतर चिदंबरम यांना इंदिरा गांधी आणि पक्षावर टीका करण्याची गरज का वाटली? तेच विधान आज भाजप आणि पंतप्रधान मोदी करत आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे.”
त्यांनी पुढे सूचक आरोप केला की, “चिदंबरम काही प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांच्या दबावाखाली आहेत का?” असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
केंद्रीय मंत्री किरन रिजिजू यांनी चिदंबरम यांच्या वक्तव्यावर थेट टीका करत म्हटले, चिदंबरमजी आता उशिरा का होईना, काँग्रेसच्या चुका मान्य करत आहेत. त्यांनी आधी कबूल केले की मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांना भारत अमेरिकेच्या दबावामुळे प्रत्युत्तर देऊ शकला नाही. आता ते सांगत आहेत की सुवर्ण मंदिरावरील ब्ल्यू स्टार कारवाईही चुकीची होती.”
जून १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या खलिस्तान समर्थक अतिरेक्यांवर कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्ल्यू स्टार सुरू केले. या कारवाईत अनेक अतिरेकी ठार झाले, पण सिख समाजात तीव्र संताप निर्माण झाला. त्यानंतर काही महिन्यांनीच इंदिरा गांधींची त्यांच्या शीख अंगरक्षकांकडून हत्या झाली.
चिदंबरम यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा बचावाच्या भूमिकेत आली आहे. पक्ष आधीच अंतर्गत मतभेद आणि नेतृत्व संकटामुळे अडचणीत असताना, या विधानाने ऐतिहासिक जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत.
राजकीय विश्लेषकांचे मत स्पष्ट आहे की “हे केवळ विधान नाही, तर काँग्रेसमध्येच स्फोट घडवणारा राजकीय बॉम्ब आहे. ब्ल्यू स्टारचा वाद पुन्हा पेटला की काँग्रेसला त्याची राजकीय किंमत चुकवावी लागते.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App