विशेष प्रतिनिधी
मुंबई – आखाती देशांमधून ५४ टन द्रवरूप ऑक्सिजन घेऊन निघालेली भारतीय युद्धनौका आयएनएस त्रिखंड सोमवारी सकाळी मुंबई बंदरात दाखल होणार आहेत. त्रिखंड युद्धनौका दोहा व कतार येथून ऑक्सिजनचे कंटेनर, सिलिंडर व अन्य वैद्यकीय सामुग्री घेऊन रवाना झाली आहे. Oxygen will recive from doha and qatar
नौदल आणि हवाई दलाने आपल्या युद्धनौका व मालवाहू विमानांचा वापर कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सुरू केला आहे. त्रिखंड युद्धनौकेद्वारे दाखल झालेले ऑक्सिजनचे कंटेनर मुंबई बंदरात उतरवून गरज असलेल्या रुग्णालयांमध्ये पाठवले जातील.
आतापर्यंत हवाई दलाच्या सी १७ प्रकारच्या मालवाहू विमानांनी देशात ४०० उड्डाणे करून गरज असलेल्या शहरांमध्ये सुमारे पाच हजार टन ऑक्सिजन (२५१ टँकर) पोहोचविला आहे. विमानांनी परदेशातही (सिंगापूर, दुबई, बँकॉक, इंग्लंड, जर्मनी, बेल्जिअम आणि ऑस्ट्रेलिया) ५९ उड्डाणे करून १,२३३ टन द्रवरूप ऑक्सिजन भारतात आणला आहे. आयएल ७६ प्रकारच्या मोठ्या मालवाहू विमानांनीही इस्राईल व सिंगापूरहून ऑक्सिजन जनरेटर व व्हेंटिलेटर आणले आहेत.
मालवाहू विमाने इंग्लंड ते जर्मनीपासून मदत घेऊन भारतात येत आहेत. युद्धनौका आखाती देशांपासून ते सिंगापूरहून ऑक्सिजनचे कंटेनर व अन्य वैद्यकीय सामुग्री भारतात आणत आहेत. त्याचा मोठा उपयोग कोरोना रुग्णांना होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App