GTB Hospital Delhi : जीवन मृत्यूमध्ये केवळ अर्धा तास ….आणि चमत्कार घडला ; अरविंद केजरीवालांचे एक ट्विट अन् केंद्र सरकारच्या तत्परतेने शेवटच्या क्षणी वाचले 500 जीव…

  • दिल्लीतील जीटीबी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 500 गंभीर रूग्णांचा मृत्यू झाला असता पण ऑक्सिजन टँकर वेळेवर आल्याने सर्व रुग्णांचे प्राण वाचले आहेत.

  • ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना ट्विट केले होते.

  • राजधानीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता काही प्रमाणात दूर झाली आहे. कारण रात्री उशिरा गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगरमधील मौजपूर येथून एक टँकर आला .Oxygen tanker reaches Delhi’s GTB Hospital just in time amid acute shortage, 500 critical Covid patients saved

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली  : दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची तीव्र कमतरता असताना आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना कळवले. जैन यांनी ट्वीट करून लिहिले की जीटीबी रुग्णालयात 500 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अशा परिस्थितीत, केवळ 4 तास पुरेल इतके ऑक्सिजन शिल्लक आहे. जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे …आणि अवघ्या काही तासांनंतर, 14 टन ऑक्सिजन टँकर यूपीच्या मोदीनगरमधून बाहेर आला आणि जीटीबी रुग्णालयात पोहोचला.रात्री 2 पर्यंत पुरेल इतकेच ऑक्सिजन शिल्लक होते चमत्कार घडला अन् 1.30 वाजता तो जीवनदायी टँकर आला…

टँकर येईपर्यंत सर्वजण अस्वस्थ होते त्याच्या आगमनाची वाट पाहत प्रत्येकजण हॉस्पिटलमध्येच थांबला होता. रुग्णालयाचे अध्यक्षसुद्धा घरी गेले नाहीत तेही तिथेच थांबले …निवासी डॉक्टरांनी सांगितले की आमच्या सर्वच
आशा जवळजवळ मंदावल्या होत्या. पण जेव्हा  ऑक्सिजन टँकर आमच्या आवारात पोहोचला तेव्हा आम्ही भावनिक झालो…आम्हाला विश्वास बसत नव्हता मात्र हे घडू शकले..

आम्ही सर्व खरोखरच चमत्कार घडण्याविषयी देवाला मनापासून प्रार्थना करीत होते. त्याचवेळी ऑक्सिजनचा टँकर आला तेव्हा सर्व डॉक्टर आनंदाने ओरडत होते. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्राचार्य अनिल जैन देखील भावूक झाले होते.

दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता झाल्यानंतर आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता ट्विट केले  होते . गुरु तेग बहादूर (जीटीबी) रुग्णालयात ऑक्सिजनची तीव्र कमतरता आहे. जीटीबीकडे केवळ 4 तास पुरेल इतके ऑक्सिजन शिल्लक आहे. विक्रेता एम / एस आयनॉक्सकडून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडर्स मिळविण्यात खूप अडचण येत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारला ट्विटरवरून त्वरित दिल्लीला ऑक्सिजन पुरवण्याचे आवाहन केले होते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आवाहन केले

एलएनजेपी हॉस्पिटल मध्ये देखील रात्री 10 टन ऑक्सिजन पोचले

एलएनजेपी हॉस्पिटलच्या अधिकार्यांनी सांगितले की काल रात्री येथे 10 टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला जो सध्यासाठी पुरेसा आहे.

Oxygen tanker reaches Delhi’s GTB Hospital just in time amid acute shortage, 500 critical Covid patients saved

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात