विशेष प्रतिनिधी
कर्नाटक : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्थिती गंभीर आहे.अनेक ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा दूर व्हावा यासाठी विविध राज्यांचे प्रशासन आणि सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन आणला जात आहे. यामुळे ऑक्सिजन तुटवडा कमी होण्यास मदत होत आहे.Oxygen Express piloted by ‘All Womeniya crew’ reaches Bengaluru
कर्नाटक राज्यात देखील परिस्थिती काही वेगळी नाही. या राज्याला दररोज १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत असून, तशी मागणी राज्य सरकारने नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर टाटानगर (जमशेदपुर) येथून बंगळुरूत शुक्रवारी ७वी ऑक्सिजन एक्सप्रेस पोहोचली. विशेष म्हणजे या रेल्वेची सर्व यंत्रणा महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळली.
या स्तुत्य प्रयत्नांची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल (Central Railway Minister Piyush Goyal) यांनी, ही रेल्वे महिला कर्मचाऱ्यांनी चालवल्याची माहिती दिली.
The 7th #OxygenExpress to Karnataka has arrived in Bengaluru from Tatanagar. This Oxygen Express train piloted by an all female crew will ensure continued supply of Oxygen for COVID-19 patients in the State. pic.twitter.com/UFWgKwVyuZ — Piyush Goyal (मोदी का परिवार) (@PiyushGoyal) May 22, 2021
The 7th #OxygenExpress to Karnataka has arrived in Bengaluru from Tatanagar.
This Oxygen Express train piloted by an all female crew will ensure continued supply of Oxygen for COVID-19 patients in the State. pic.twitter.com/UFWgKwVyuZ
— Piyush Goyal (मोदी का परिवार) (@PiyushGoyal) May 22, 2021
शुक्रवारी ऑक्सिजन ट्रेन जमशेदपूरहून बंगळुरूत दाखल झाली. या ट्रेनच्या माध्यमातून १२० मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन आणण्यात आला असून, ही ट्रेन महिला कर्मचाऱ्यांनी चालवली.
याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट केलं.७वी ऑक्सिजन एक्सप्रेस टाटानगर येथून (जमशेदपूर) बंगळुरूत दाखल झाली आहे. सर्व महिला कर्मचाऱ्यांमार्फत चालवण्यात आलेल्या या ऑक्सिजन ट्रेनमुळे राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा निरंतर पुरवठा करणं शक्य होणार असल्याचे मंत्री गोयल यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील जामनगर येथून ८वी ऑक्सिजन एक्सप्रेस देखील बेंगळुरु येथे नुकतीच पोहोचली आहे. या एक्सप्रेसच्या माध्यमातून १०९ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणण्यात आला आहे.
Oxygen Express piloted by ‘All Womeniya crew’ reaches Bengaluru
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App