विशेष प्रतिनिधी
मुंबई : Abu Azmi आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे वक्तव्य केले आहे. फिलिपाइन्स सोबत आमचा धर्म जुळला आहे. त्यांचे झेंडे जाळले तर आम्ही त्याचा विरोध करू, अशी भूमिका अबू आझमी यांनी मांडली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यावरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Abu Azmi
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप आमदार अबू आझमी यांनी केला आहे. दहशतवादी देशात आले आणि हल्ला करून आरामात निघून गेले. यावर सरकारने चिंता व्यक्त करण्याची आवश्यकता असल्याचा देखील ते म्हणाले. सरकारने यावर चिंतन करायला हवे, असा सल्ला त्यांनी यावेळी सरकारला दिला.
दहशतवादी आले आणि त्यांनी जात विचारून गोळ्या झाडल्या. तसेच रत्नागिरीतील एक मंत्री देखील करायला सांगत आहे. आधी हनुमान चालीसा ऐका आणि नंतरच खरेदी करा, असा सल्ला हा मंत्री लोकांना देत आहे. मग दहशतवादी आणि त्या मंत्र्यांमध्ये काय फरक? असे म्हणत अबू आझमी यांनी नाव न घेता मंत्री नितेश राणे यांच्यावर देखील निशाणा साधला. देशात धर्म विचारात कारवाई होत असल्याचा आरोप देखील आझमी यांनी यावेळी केला आहे.
पुन्हा एकदा वाद वाढण्याची शक्यता
भारतामध्ये माणुसकी शिल्लक राहिली नाही. अनेक ठिकाणी मुस्लिमांना त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी आझमी यांनी केला आहे. देशात धर्म विचारून कारवाई होत असल्याबद्दल देखील त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, आता अबू आझमी यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नितेश राणे आणि भारतीय जनता पक्ष आता अबू आझमी यांच्या या वक्तव्याला काय प्रत्युत्तर देतात? हे आता पहावे लागेल.
औरंगजेबाचे समर्थन करणारे वक्तव्य
अबू आझमी यांनी या आधी देखील औरंगजेबाचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेत देखील गोंधळ उडाला होता. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी देखील अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यामुळे अबू आझमी यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. मात्र, नंतर अबू आझमी यांनी त्यांचे विधान मागे घेतले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App