विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्यात सीबीआयने अटक केल्यानंतर अटकेच्या विरोधात विरोधकांनी स्वतःची एकी साधण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांनीच एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रातून विरोधकांमधली बेकीच समोर आली!! कारण सर्व विरोधकांनी मिळून पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर फक्त आठच विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आढळल्या, तर बाकीच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सह्या यातून गायब तरी झाल्या किंवा मूळातच यांनी केल्या नव्हत्या!! Opposition tried to unite on the issue of manish sisodia’s arrest, but disintegrated opposition came on the forefront in a letter to prime minister
भारतात लोकशाही उरली नाही. लोकशाहीचे रूपांतर एकाधिकारशाहीत झाले आहे, असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या पत्रात केला आहे. या पत्रावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांच्या सह्या आहेत.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना दारू घोटाळ्यात सीबीआय कडून अटक!!; 10000 कोटींच्या उत्पादन शुल्काची अफरातफर
पण याच पत्रावर काँग्रेस, एच. डी. देवेगौडा यांचा जेडीएस, नितीश कुमार यांचा जेडीयु, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाज पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम आदी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सह्याच नाहीत. त्यामुळे मनीष सिसोदिया यांना झालेली अटक फक्त आठच विरोधी पक्षांच्या नेत्यांना अन्याय वाटते आहे का?? आणि बाकीच्या विरोधी पक्षांचे त्यांच्या अटकेला राजकीय समर्थन आहे का??, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाकी पत्रात उपस्थित केलेला देशात लोकशाही नसल्याचा आणि एकाधिकारशाही असल्याचा मुद्दा काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये आपल्या भाषणात मांडला होताच. तोच फक्त या पत्रामध्ये लेखी स्वरूपात उमटला आहे. पण या पत्रामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात विरोधकांच्या एकी ऐवजी बेकीचीच चर्चा जास्त होत आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App