नाशिक : मोदी + शाहांना विरोधकांचा रिटायरमेंटचा सल्ला; पण स्वतःचे घरगुती पक्ष कुरकुरत चालवा!! असे देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच विरोधी पक्षांची अवस्था झालीय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात मधल्या एका जाहीर कार्यक्रमात आपल्या रिटायरमेंटचा प्लॅन सांगितला 75 व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर पण वेद, उपनिषदांचा अभ्यास करणार आणि नैसर्गिक शेती करणार, असे ते म्हणाले. अमित शहा यांच्या एका वाक्यानंतर विरोधी पक्षांना आणि माध्यमांना आनंदाची उकळी फुटली. अमित शहा पंधरा वर्षांनंतर (तरी) रिटायर होणार याच्या बातम्या त्यांनी जोरदार चालविल्या. त्यामुळे देशभर अमित शहा यांच्या रिटायरमेंट बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रिटायरमेंटची चर्चा सुरू करायची संधी माध्यमांना आणि विरोधी पक्षांना मिळाली.
संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत हाच मुद्दा उचलून धरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता मोदींना रिटायर व्हायला सांगतो आहे कारण त्यांनी 75 वर्षांचा नियम घालून दिला. आता तो नियम स्वतःलाच लागू करा असे संघ त्यांना म्हणतो आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. मोदींचे सगळे देश फिरून झाले सत्तेचे सगळे उपभोग घेऊन झाले आता त्यांनी रिटायर्ड व्हावे, असा आगाऊ सल्ला देखील संजय राऊत यांनी दिला. बाकीच्या विरोधी पक्षांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला.
– पवारांची रिटायरमेंट नंतर माघार
पण मोदी शाह यांच्या रिटायरमेंट प्लान मुळे आनंदाची उकळी फुटलेले सगळे घरगुती विरोधी पक्ष कुरकुरत चालवायची वेळ विरोधकांवर आली. मोदी + शाहांच्या रिटायरमेंटच्या उचापती करणाऱ्या संजय राऊत यांना शरद पवार कधी रिटायर होणार आणि जाहीरपणे रिटायरमेंट घेतली, तर ते पुन्हा केव्हा माघार घेणार?, हा सवाल कोणी विचारला नाही. त्यामुळे उत्तर त्यांना द्यावे लागले नाही. पण शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीच्या कार्यक्रमात रिटायरमेंट जाहीर केली होती, नंतर कार्यकर्त्यांच्या दबावाच्या नावाखाली ती रिटायरमेंट मागे घेतली होती आणि ते आपला पक्ष कुरकुरत चालवत आहेत, हे संजय राऊत यांना दिसले नाही.
– लालू 22 व्या वेळी पक्षाध्यक्ष
तिकडे बिहारमध्ये लालूप्रसाद यादव सगळ्या आजारांनी ग्रस्त . पण राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या खुर्चीवरून उतरायची त्यांची तयारी नाही. त्यांनी पक्षाची सगळी कार्यकारी सूत्रे तेजस्वी यादवांकडे सोपविली पण ते स्वतः रिटायर्ड झाले नाहीत, तर बाविसाव्या वेळा राष्ट्रीय जनाचा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले.
तामिळनाडूत करुणानिधी अखेरपर्यंत द्रविड मुन्नेत्र कळघमच्या अध्यक्षपदावरच होते. मुलायम सिंग यादव समाजवादी पक्षाचे “पितामह” म्हणून टिकवले गेले. दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनाप्रमुखच राहिले. या सगळ्यांच्या रिटायरमेंटची चर्चा सध्याच्या कुठल्याच विरोधी पक्षांनी केली नाही. हे सगळे घरगुती पक्ष ज्यांनी स्थापन केले, त्यांनीच कुरकुरत चालवले. पण त्यांच्या पक्षांचे वारसदार मोदी + शाहांच्या रिटायरमेंटच्या चिंतेत बुडाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App