तुरुंगात जाऊनही खुर्चीला चिकटून राहणाऱ्यांची उचलबांगडी; मोदी सरकारने विधेयक मांडताच लोकसभेत कागदांची फाडाफाडी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भ्रष्टाचार किंवा फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये अटक झाल्यानंतर 30 दिवसांपेक्षा जास्त तुरुंगात राहणाऱ्या मंत्र्यांची त्यांच्या खुर्च्यांवरून उचलबांगडी करायचे विधेयक मोदी सरकारने आज लोकसभेत मांडले परंतु त्यामुळे काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांच्या अंगाचा तिळपापड झाला. विरोधकांनी संबंधित विधेयकाचे कागद फाडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अंगावर फेकले. या सगळ्या प्रकारामुळे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज स्थगित केले.

भ्रष्टाचाराच्या खटल्यात किंवा फौजदारी गुन्ह्याच्या खटल्यात अनेक मंत्र्यांना अटक होऊन त्यांना तुरुंगात राहावे लागले तरी त्या मंत्र्यांनी कधी राजीनामा दिला नाही. तुरुंगात बसूनच ते मंत्रिपदाच्या खुर्चीला चिकटून राहिले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी, महाराष्ट्रातले मंत्री संजय राठोड या नेत्यांची उदाहरणे देशात घडली. ज्यांनी अटक होऊन तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा मंत्रीपद सोडले नव्हते.

या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार किंवा फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये अटक झाल्यानंतर पंतप्रधान मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांना महिनाभराच्या खुर्ची सोडायला लागणारे विधेयक गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत मांडले. मात्र काँग्रेस सह सगळ्या विरोधकांनी त्या विधेयकाचा जोरदार विरोध केला मोदी सरकार देशात पोलिसी राज्य आणू पाहत आहेत. या विधेयकाच्या अडून देशात हुकूमशाही लादू पाहत आहे, असा आरोप काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांनी केला. तरी देखील अमित शाह यांनी संबंधित विधेयक मांडलेच. अटक झाल्यानंतर संबंधित पंतप्रधान मुख्यमंत्री अथवा कुठलाही मंत्री एक महिनाभर तुरुंगात राहिला आणि त्याने राजीनामा दिला नाही तर 31 व्या दिवशी राष्ट्रपतींच्या करवी संबंधिताची उचलबांगडी करण्यात येईल असे या विधेयकात नमूद केले आहे.

पण गृहमंत्री अमित शाह हे विधेयक मांडत असताना काँग्रेस सकट सगळ्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत प्रचंड गदारोळ केला. संबंधित विधेयकाची कागदपत्रे फाडून अमित शहा यांच्या दिशेने फेकली. अमित शहा यांनी संबंधित विधेयक संसदेच्या समिती पुढे पाठविण्याची परवानगी लोकसभेच्या सभापतींकडे मागितली.

Opposition MPs tear copies of three bills introduced by Union Home Minister Amit Shah and throw paper bits towards him in Lok Sabha

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात