नाशिक : नाव महागठबंधन, यात्रा मात्र वेगवेगळ्या; तरीही बिहारमध्ये बळकट भाजपला हरविण्याचा दावा!!, असला प्रकार राज्यात सुरू आहे.Opposition mahagathbandhan breaks into pieces
बिहारमध्ये राहुल गांधींनी सुरुवातीला मतदार अधिकार यात्रा काढली. त्या यात्रेमधून त्यांनी कन्हैया कुमारला बिहारचे नवीन नेतृत्व म्हणून पुढे आणायचा प्रयत्न केला परंतु तो फारसा यशस्वी झाला नाही हे लक्षात येताच त्यांनी तेजस्वी यादवला बरोबर घेतले. 50 पैकी 20 मतदारसंघांमध्ये तेजस्वी यादव बरोबर यात्रा काढली. त्यानंतर राहुल गांधींनी ब्रेक घेतला आणि ते मलेशियाला निघून गेले तिथे त्यांनी जाकीर नाईकची भेट घेतली असे सांगितले गेले.
तेजस्वी यादव स्वतंत्र यात्रेत
पण या दरम्यान तेजस्वी यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाची स्वतंत्र यात्रा काढली. राहुल गांधी आपल्याला मुख्यमंत्रीपदासाठी भाव देत नाही हे लक्षात येताच तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी यांच्यापासून आणि काँग्रेस पासून अंतर राखले. स्वतःची सामाजिक न्याय यात्रा 50 पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये नेली. त्या यात्रेत तेजस्वी यादव घोडीवर बसले. ट्रॅक्टर वर बसले. आणखी अन्य वाहनांमध्ये बसले, पण यांनी कटाक्षाने काँग्रेस कार्यकर्त्यांना बाजूला ठेवले.
काँग्रेसची स्वतंत्र वाटचाल
दोनच दिवसांपूर्वी पाटण्यातल्या सदाकत आश्रम मध्ये काँग्रेस कार्यकारिणीने मोठी बैठक घेतली. तिच्यात बिहारमध्ये पक्ष संघटना स्वबळावर वाढवायचा निर्णय घेतला. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचा एकच छोटा कार्यक्रम केला. पण तिथे दोघांनी एकमेकांच्या पदांविषयी काहीही शब्द दिला नाही. केवळ महागठबंधनचा एक कार्यक्रम या पलीकडे त्या कार्यक्रमातून काही साध्य झाले नाही.
ओवैसींची स्वतंत्र यात्रा
एकीकडे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यात असे फाटत चालले असताना असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमध्ये एन्ट्री केली. त्यांनी स्वतःची स्वतंत्र यात्रा काढली. ते बिहार मधल्या मुस्लिम बहुल किंवा मुस्लिमांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी सत्ताधारी भाजप आणि जदयू यांच्यासह लालूप्रसाद यांच्या राजद आणि काँग्रेस या दोन्ही आघाड्यांचे वाभाडे काढले. भाजप आणि जदयू यांच्याकडून मुसलमानांना काही अपेक्षाच नाहीत, पण महागठबंधनला मत देऊन मुसलमानांचा काही फायदा झाला नाही. लालूप्रसाद यादव यांनी मुसलमानांसाठी काही केले नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेस आणि राजद यांच्या महागठबंधनची गाडी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानावर पळण्यापूर्वीच पंक्चर झाली. यादव आणि अन्य ओबीसी वर्ग एकत्र करून मोठी मतपेढी बांधायचा त्यांचा इरादा केरात गेला.
एकजूट करायचे विसरले
पण वर उल्लेख केलेल्या सगळ्या नेत्यांनी मात्र कोणत्याही स्थितीत भाजप आणि जदयू यांच्या सत्ताधारी आघाडीला हरविण्याचा राणा भीमदेवी ताट आणला. पण सत्ताधारी आघाडी विरोधात एकजूट करायला ते विसरून गेले. काही दिवसांपूर्वी ते एक झाले आणि नंतर आपापल्या छावण्यांमध्ये निघून गेले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App