मोदी + राजनाथ + जयशंकर उच्चस्तरीय बैठक, Operation sindoor अजून सुरूच, भारतीय हवाई दलाचा स्पष्ट खुलासा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या तथाकथित शस्त्रसंधी झाल्यानंतर देखील पाकिस्तानने अवघ्या तीन तासांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले भारतावर ड्रोन आणि तोफगोळ्यांचे हल्ले चढविले. भारताने देखील पाकिस्तानला तडाखेबंद प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले.

या पार्श्वभूमी वर भारतीय हवाई दलाने आज एक स्पष्ट खुलासा करणारे ट्विट केले. ऑपरेशन सिंदूर थांबविलेले नसून ते अद्याप सुरू आहे भारतीय हवाई दलाने आपली टार्गेट्स पूर्ण केली असून भारतीय सैन्य दलाने ठरवून दिलेल्या टार्गेट्सवर हवाई दलाने प्रिसिजन आणि प्रोफेशनल हल्ले चढविले. ऑपरेशन सिंदूर अजून सुरू असून योग्य वेळेला त्या संदर्भातल्या तपशीलांचे खुलासे केले जातील. तोपर्यंत कुणीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असा खुलासा भारतीय हवाई दलाने आपल्या ट्विटमध्ये केला. भारताने पाकिस्तानवर विश्वास ठेवून शस्त्रसंधी केल्याच्या अफवा आणि फेक न्यूज भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त केल्या.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एक उच्चस्तरीय बैठक घेतली यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि संरक्षण दलांचे चारही प्रमुख उपस्थित होते. त्यानंतरच ऑपरेशन सिंदूर थांबविले नसल्याचे भारतीय हवाई दलाचे ट्विट समोर आले.

OperationSindoor | Indian Air Force tweets Since the Operations are still ongoing

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात