विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Indian Iron Dome ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने केवळ दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले नाही, तर स्वदेशी संरक्षण क्षमतेचा प्रभावी वापर करत जगाला तांत्रिक प्रगती आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडविले. या कारवाईत भारतीय लष्कराने प्रगत हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीने लष्करी तळ, धोरणात्मक स्थळे आणि नागरी ठिकाणांचे यशस्वीरित्या संरक्षण केले.Indian Iron Dome
८ मे रोजी पाकिस्तानने जम्मू, अमृतसर, पठाणकोट आणि जैसलमेरसारख्या शहरांना लक्ष्य करत ड्रोन स्वार्मद्वारे हल्ला चढवला. या हल्ल्यांचे उद्दिष्ट भारतीय लष्करी ठिकाणांबरोबरच नागरी वस्त्यांवरही हानी पोहोचवणे होते. हमासने इस्रायलविरोधात वापरलेल्या तंत्रावर आधारित असलेला हा एकाच वेळी अनेक हल्ल्यांचा प्रयत्न होता. परंतु भारताच्या जागरूक आणि सज्ज हवाई संरक्षण यंत्रणेमुळे हे सर्व हल्ले निष्फळ ठरले.
पाकिस्तानी हल्ल्यांना रोखण्यासाठी भारताने रशियन बनावटीच्या S-400 सुदर्शन चक्र प्रणाली बरोबरच आपली स्वदेशी विकसित आकाशतीर हवाई संरक्षण प्रणाली वापरली. पश्चिम सीमेवर तैनात करण्यात आलेल्या आकाशतीर प्रणालीने आकाशात अभेद्य सुरक्षा कवच उभारले होते. विविध रडार स्रोतांमधून माहिती संकलित करून, आकाशतीर प्रणालीने प्रत्येक क्षेपणास्त्राना अचूक लक्ष्य करून नष्ट केले
Bharat Electronics Limited (BEL) ने विकसित केलेली आकाशतीर प्रणाली ही एक अत्याधुनिक एअर डिफेन्स कंट्रोल अँड रिपोर्टिंग सिस्टीम (ADCRS) आहे. २०२४ पासून टप्प्याटप्प्याने लष्करात या प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. ही प्रणाली सीमावर्ती आणि रणांगण क्षेत्रातील कमी उंचीवरील हवाई हल्ल्यांवर लक्ष ठेवते, तसेच कमी वेळेत निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करून एकत्रित ‘ऑपरेशनल पिक्चर’ तयार करते.
AWACS, AEW&C आणि विविध ग्राउंड रडार्सकडून मिळणारा डेटा एकत्र करून ही प्रणाली स्वयंचलित पद्धतीने निर्णय घेते. आकाशतीर प्रणालीच्या यशस्वी वापरामुळे भारताने केवळ युद्धभूमीवर वर्चस्व सिद्ध केले नाही, तर संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले आहे. हा उपक्रम ‘मेक इन इंडिया’ धोरणाचे उत्तम उदाहरण ठरतो.
ऑपरेशन सिंदूरने पुन्हा एकदा सिद्ध केले की, भारत आता संरक्षणाच्या बाबतीत केवळ परावलंबी देश राहिलेला नाही. स्वतःची शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान आणि प्रणाली विकसित करत, संपूर्ण जगाला दाखवून दिले की भारत आत्मनिर्भर आहे, सज्ज आहे आणि हल्लेखोरांवर निर्णायक कारवाई करण्यास सक्षम आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App