वृत्तसंस्था
जोधपूर : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे बर्याच दिवसांनी काही बोलल्या आहेत. राजस्थानच्या पुढच्या मुख्यमंत्रिपदावर बाबत प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, की नुसते कुणाला वाटून मुख्यमंत्री होता येत नाही. जो 36 कौमचे प्रेम संपादन करेल, तोच मुख्यमंत्री होईल.only that person who has the love of all the communities (chattis kaum) gets to rule,” former CM of Rajasthan Vasundhara Raje
भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अनेक स्पर्धक तयार झाले आहेत का?, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी 36 कौम की पसंद का मुख्यमंत्री बनेगा असे उत्तर दिले.
"It doesn’t happen just by wishing so & only that person who has the love of all the communities (chattis kaum) gets to rule," former CM of Rajasthan Vasundhara Raje while responding to a question on several BJP leaders eying the chief ministerial post in the state (22.10) pic.twitter.com/rPtRjJOaEb — ANI (@ANI) October 23, 2021
"It doesn’t happen just by wishing so & only that person who has the love of all the communities (chattis kaum) gets to rule," former CM of Rajasthan Vasundhara Raje while responding to a question on several BJP leaders eying the chief ministerial post in the state (22.10) pic.twitter.com/rPtRjJOaEb
— ANI (@ANI) October 23, 2021
केंद्रीय जलसंपत्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या आईचे निधन झाले त्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी वसुंधरा राजे दोन दिवस जोधपूरच्या दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी राजमहालात न राहता सरकारी सर्किट हाऊस वर राहणे पसंत केले आहे. तसेच सर्वसामान्य महिलांमध्ये मिसळून एकत्र रबडीचा आस्वाद घेणे देखील पसंत केले आहे. याच दौर्यात त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि स्थानिक नेत्यांची संवाद साधण्याची संधी घेतली आहे.
हे एक प्रकारे वसुंधरा राजे यांची स्वत:च्या राजकीय प्रतिमेचे डागडुजी करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत अनेक जण उतरण्याच्या प्रश्नावर त्यांनी 36 कौम म्हणजे सर्व जाती जमाती यांना बरोबर घेऊन चालणारी व्यक्तीच मुख्यमंत्री होईल, असे सूचक उद्गार काढले आहेत. हा एक प्रकारे भाजप श्रेष्ठींना दिलेला देखील इशारा असल्याचे मानले जात आहे.
राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा पराभव झाला होता. त्यावेळी “मोदी तुमसे बैर नही; वसुंधरा तेरी खैर नाही” हिंदी घोषणा राजस्थानात गाजली होती. शिवाय वसुंधरा राजे यांचे भाजपच्या मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाशी फारसे जमत नसल्याचेही चर्चा आहे. वसुंधरा राजे यांना राजस्थानात एकछत्री अंमल हवा आहे. आणि त्यालाच मोदीच यांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर वसुंधरा राजे यांच्या 36 कौम की पंजाब का मुख्यमंत्री बनेगा, या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे.
हत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App