विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर नियमानुसार राहुल गांधींची खासदारकी बहाल झाली आहे पण काँग्रेसमध्ये मात्र ते “पंतप्रधान” झाल्याचा आनंद पसरला आहे!! only Rahul Gandhi’s MP was awarded
देशातल्या सर्व मोदींना राहुल गांधींनी चोर ठरविल्याच्या मुद्द्यावर सुरत कोर्ट आणि गुजरात हायकोर्ट यांनी फर्मावलेल्या दोन वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. दोन वर्षे शिक्षा सुनावताना कनिष्ठ न्यायालयाने पुरेशी कारणे दिली नसल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले. परिणामी राहुल गांधींची खासदारकी नियमानुसार वाचली. लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी कनिष्ठ न्यायालयांच्या निकालानंतर रद्द केली होती. सुप्रीम कोर्टाचा निकाल येताच लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी पुन्हा बहाल केली. तशी अधिसूचना काढली.
राहुल गांधी कायद्याच्या नजरेत दोषीच, फक्त शिक्षेला स्थगिती दिल्याने ते संसदेत येऊ शकतात; महेश जेठमलानींनी मांडली वस्तूस्थिती!!
यानंतर काँग्रेसमध्ये प्रचंड आनंद पसरला. राहुल गांधी पुन्हा संसदेत दिसणार, ते सरकारला घेरणार, मोदी सरकारला जाब विचारणार, अशा बातम्या आल्या. वेगवेगळ्या प्रदेश काँग्रेसने त्यांच्या अभिनंदनाचे ठराव केले. काँग्रेसमध्ये राजकीय चैतन्य पसरले.
पण राहुल गांधींची केवळ खासदारकी बहाल झाली आहे, ती देखील सुप्रीम कोर्टाने शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली म्हणून!! सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना निर्दोष मानलेले नाही. या मुद्द्याकडे काँग्रेसचे पूर्ण दुर्लक्ष झाले आणि त्यांनी राहुल गांधी जणू पंतप्रधान झालेत, असा जल्लोष चालवला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App