बाजूने पडली २६९ मतं; राज्यसभेत आजही संविधानावर चर्चा होत आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या 17 व्या दिवशी आज सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक लोकसभेत मांडले आणि ते मंजूरही झाले विधेयकाच्या बाजूने २६९ मतं पडली. तर राज्यसभेत संविधानावर चर्चा सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशीही राज्यसभेत संविधानावर चर्चा होणार आहे. याआधी शुक्रवारी आणि शनिवारी लोकसभेत संविधानावर चर्चा झाली. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर दिले.
या अधिवेशनात सरकार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक मांडणार आहे. लोकसभेच्या अजेंडामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, एक राष्ट्र-एक निवडणूक विधेयक म्हणून ओळखले जाणारे संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक, २०२४ हे केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल लोकसभेत सादर केले. राज्यसभेत आजही संविधानावर चर्चा होत आहे.
Chhagan Bhujbal Outburst: अजितदादा + प्रफुल्ल पटेल + तटकरेंनी केल्या गेमा; भुजबळ म्हणाले, मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का??
एक देश, एक निवडणूक विधेयक सरकार आज लोकसभेत मांडणार असल्याने भाजप आणि काँग्रेसने आपल्या खासदारांना व्हिप जारी केला होता. ज्यामध्ये सर्व सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. वन नेशन, वन इलेक्शन विधेयक सादर केल्यानंतर केंद्र सरकार ते संसदेच्या संयुक्त समितीकडे (जेपीसी) पाठवण्याची शिफारस करेल. या विधेयकाची प्रत सर्व खासदारांना देण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App