विशेष प्रतिनिधी
बेंगलोर : भारताचे स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. ते कोणाच्या कृपेने मिळालेले नाही, तर ते आपल्याला दीर्घकाळच्या संघर्षातून मिळाले आहे. ते टिकवणे आणि वर्धिष्णू करणे आपल्या हातात आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी आपण काय करतो, हे आपणच आपल्याला विचारले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. त्यांनी बंगलोर मध्ये आज ध्वजारोहण केले. One must ask oneself what he or she is doing for national development, urges dr. mohan bhagwat
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प. पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी ने स्वतंत्रता दिवस के अवसर पर बंगलुरु में राष्ट्रीय ध्वज फहराया और सम्बोधित किया। इस अवसर पर मान. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले जी भी उपस्थित थे। pic.twitter.com/dItvp5IIPA — RSS (@RSSorg) August 15, 2023
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प. पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी ने स्वतंत्रता दिवस के अवसर पर बंगलुरु में राष्ट्रीय ध्वज फहराया और सम्बोधित किया। इस अवसर पर मान. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले जी भी उपस्थित थे। pic.twitter.com/dItvp5IIPA
— RSS (@RSSorg) August 15, 2023
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना मोहन भागवत म्हणाले, की 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. समस्त भारतीयांनी इंग्रजांच्या हातातून आपला देश मुक्त केला, हा आपल्यासाठी गौरवाचा क्षण आहे. देशाचे स्वातंत्र्य आपल्याला कोणाच्या कृपेने मिळालेले नाही, तर करोडो देशवासायांनी संघर्ष करून ते मिळवले आहे. हा स्वतंत्र भारत हातात लाठी काठी घेऊन इतरांवर राज्य करणारा नाही, तर संपूर्ण जगाच्या कल्याणाची कामना करणारा हा भारत आहे.
आम्ही भारतीय मानवता पर्यावरण संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाची कामाला करतो आणि त्यासाठी स्वतःला समर्पित करतो. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी देश मला काय देतो याचा विचार करण्यापेक्षा आपण देशाला काय देतो?, याचा विचार केला पाहिजे. देशाच्या विकासातच आपला विकास समाहित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. देशाच्या विकासासाठी प्रगतीसाठी मी जगेन, हा संकल्प केला पाहिजे, असे आवाहन डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App