नवीन संसद भवनाबाहेर कंगना रणौतचे महिला आरक्षण विधेयकावर मोठं विधान, म्हटलं…


 संसदेच्या नवीन इमारतीत देशातील नामवंत महिलांना खास आमंत्रित करण्यात आले होते.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक मंगळवारी नवीन संसद भवनात मांडण्यात आले. या विधेयकाला ‘नारी शक्ती वंदन कायदा’ असे नाव देण्यात आले आहे. या विधेयकात लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. On Womens Reservation Bill actor Kangana Ranaut says

या विधेयकाबाबत महिलांमध्ये उत्साह आहे. संसदेच्या नवीन इमारतीत देशातील नामवंत महिलांना खास आमंत्रित करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत आमंत्रित विशेष महिला सदस्यांना मिठाई वाटली.

यावेळी नवीन संसदेबाहेर अभिनेत्री कंगना रणौत म्हणाली, ”नवीन संसदेचे पहिले सत्र महिला सक्षमीकरणासाठी समर्पित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ऐतिहासिक काम केले आहे. ते कोणताही मुद्दा मांडू शकले असते, पण त्यांनी महिला सक्षमीकरणाची निवड केली. मला वाटते की हे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरेल.”

कंगना रणौत पुढे म्हणाली  ”हे नवीन संसद भवन आज आपण ज्याला अमृत काल किंवा सुवर्णयुग म्हणतो त्याची प्रतिकृती आहे. या वास्तूमध्ये भारत आणि भारतीयत्वाचे दर्शन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.”

On Womens Reservation Bill actor Kangana Ranaut says

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!