जोहान्सबर्ग : भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे, जिथे जगातील महासत्ता पोहोचू शकल्या नाहीत. पहिल्यांदाच एखादा देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचला आहे. भारताचे चांद्रयान-3 लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आहे. चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. यामुळे देश आनंदाने दुमदुमत आहे. अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. दरम्यान, ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोच्या वैज्ञानिकांचे आणि देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. यासोबतच ते म्हणाले की आता सूर्य आणि शुक्राशी संबंधित मोहिमेची वेळ आहे. On the successful landing of Chandrayaan 3 Prime Minister Modi said
देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, असा इतिहास डोळ्यांसमोर घडताना पाहिल्यावर जीवन धन्य होऊन जाते. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्रजीवनाचे चिरंतन चैतन्य बनतात. हा क्षण अविश्वसनीय आहे. हा क्षण अप्रतिम आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. अडचणींचा महासागर पार करण्याचा हा क्षण आहे. विजयाच्या चंद्रमार्गावर चालण्याचा हा क्षण आहे. हा क्षण 140 कोटी हृदयाच्या ठोक्यांच्या शक्तीचा आहे. हा भारतातील नव्या ऊर्जेचा, नव्या विश्वासाचा, नव्या चेतनेचा क्षण आहे. भारताच्या उगवत्या नियतीला हाक देण्याचा हा क्षण आहे.
दक्षिण आफ्रिकेतून भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन करताना त्यांनी भारताच्या अमृतकालात पहिल्या किरणांच्या साक्षीने भारताने नव्या अंतराळ युगात प्रवेश केल्याची ग्वाही दिली. जगातला कोणताही विकसित देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक आपले यान उतरवून शकला नसल्याचा आवर्जून उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला, पण त्याचवेळी आपले चांद्रयान 3 मोहिमेचे यश हे जागतिक पातळीवरचे यश आहे. भारताच्या “एक विश्व, एक कुटुंब” या संकल्पनेला पुढे नेणारे यश आहे, हे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले. भारताचा चंद्र दक्षिण ध्रुवावरील विजय हा त्यांनी 140 कोटी जनतेला समर्पित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App