तिकडे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख देतोय भारताला धमकी; इकडे RAW चे माजी प्रमुख करताहेत भारत – पाकिस्तान चर्चेची वकिली!!

Amarjit Singh Dulat

नाशिक : तिकडून पाकिस्तानचा लष्करप्रमुख देतोय भारताला धमकी आणि इकडे RAW चे माजी प्रमुख करताहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या चर्चेची वकीली!! अशा दोन समांतर घटना घडल्यात.

– पाकिस्तानी लष्करप्रमुखाचे गरळ

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तान ओवरसीज कॉन्फरन्स मध्ये हिंदू समाज आणि भारत यांच्या विरोधात गरळ ओकली. मुस्लिम आणि पाकिस्तानी हिंदूंपेक्षा पूर्ण वेगळे आहेत. त्यांचा धर्म आणि आपला धर्म वेगळा आहे. त्यांची आणि आपली संस्कृती वेगळी आहे. मूळात आपण दोन वेगळे लोकं आहोत. म्हणून आपल्या पूर्वजांनी “टू नेशन थियरी” मांडून आपल्यासाठी पाकिस्तानची निर्मिती केली. अनेक पिढ्यांनी त्यासाठी बलिदान केले. हा सगळा इतिहास पाकिस्तानने आपल्या पुढच्या पिढ्यांना शिकवला पाहिजे. जम्मू काश्मीर पाकिस्तानचा अभिन्न हिस्सा होता, आहे आणि राहील. भारतच काय, पण जगातली कुठलीही ताकद जम्मू-काश्मीरला पाकिस्तान पासून अलग काढू शकणार नाही, असे भाषण असे मुनीर यांनी ठोकले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ तिथे हजर होते. त्यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखाची भारताच्या विरोधातली गरळ मुकाट्याने ऐकून घेतली. त्या विरोधात कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करायची हिंमत दाखविली नाही.

त्या उलट भारताची गुप्तचर संघटना रिसर्च अँड एनालिसिस विंग अर्थात RAW चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या चर्चेची वकिली केली. भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चा सुरू केली पाहिजे. दोन्ही देशांच्या मैत्रीपूर्ण चर्चेतूनच कुठल्याही समस्येवर तोडगा निघू शकतो. त्यामुळे भारताने चर्चा अडवून ठेवू नये, अशी सूचना दुलत यांनी केली. अमरजीत सिंह दुलत यांनी जम्मू काश्मीर वर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात आणि नंतर देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या चर्चेची वकिली केली. अशीच वकिली मणिशंकर अय्यर यांनी दोन्ही देशांमध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये केली होती.

अमरजीत सिंह दुलत हे वाजपेयी सरकारच्या काळात RAW चे प्रमुख होते. पण ते soft liner म्हणून ओळखले जायचे. ते RAW चे मुख्य असतानाच कारगिल युद्ध झाले. त्यांची मते सध्याच्या मोदी सरकारच्या आक्रमक धोरणाच्या विसंगतच राहिलीत. त्यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आणि नंतर देखील मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधातच मते व्यक्त केली. मी सध्याच्या सरकारचा घटक नाही. त्यामुळे त्याविषयी काही बोलू शकत नाही, पण भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चा सुरू करावी, असे माझे वैयक्तिक मत आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

– पाकिस्तानी इको सिस्टीमचे काम

काँग्रेस प्रणित सरकारांच्या काळात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद शिगेला पोहोचलेला असताना सुद्धा भारत सरकारचे धोरण पाकिस्तानशी “मैत्रीपूर्ण चर्चा” करायचेच राहिले होते. पण त्या चर्चांमधून कुठलाही ठोस तोडगा कधीच पुढे आला नाही. पाकिस्तानने दहशतवादाला चिथावणी देणे देखील थांबवले नाही. पाकिस्तानचा हा अनुभव लक्षात घेऊन मोदी सरकारने दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊच शकत नाही. पाकिस्तानने दहशतवाद थांबविल्याशिवाय त्या देशाशी कुठल्याही पातळीवर चर्चा करायचीच नाही, अशी ठाम भूमिका घेतली आणि तिच्यात सातत्य ठेवले. त्यामुळे पाकिस्तानी इको सिस्टीमने भारतातल्या तथाकथित उदारमतवाद्यांना हाताशी धरून चर्चेच्या पुड्या सोडायला प्रवृत्त केले. अमरजीत सिंह दुलत यांनी भारताने पाकिस्तानशी चर्चा सुरू करण्यासाठी केलेली वकिली हा त्यातलाच एक प्रकार असल्याचे मानावे लागेल.

On India and Pakistan’s relation, Former R&AW Chief Amarjit Singh Dulat says, “It is my opinion that India and Pakistan should sit and talk

हत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात