विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – ‘ओमिक्रॉन’चा प्रसार जगात वेगाने होत असला तरी कोरोना विषाणूचा हा प्रकार ‘डेल्टा’ या प्रकाराच्या तुलनेत कमी धोकादायक असल्याचे प्राथमिक अहवालावरून दिसून येत असल्याचे अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांनी सांगितले आहे. Omricon is not dangerous than delta says US experts
ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांमध्ये दिसून आलेली लक्षणे, त्यांची तीव्रता, रुग्ण गंभीर आजारी पडण्याचे प्रमाण याचा अभ्यास केला असता ओमिक्रॉन हा कमी धोकादायक असल्याचे दिसून आले आहे, असे डॉ. फॉसी यांनी सांगितले.
निश्चितत निष्कर्ष काढण्यासाठी आणखी अभ्यास आणि माहिती आवश्यसक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ओमिक्रॉन सर्वप्रथम आढळलेल्या दक्षिण आफ्रिकेत रुग्णालयात भरती होणाऱ्यांच्या संख्येत विशेष वाढ झाली नसल्याचे डॉ. फॉसी यांनी निदर्शनास आणून दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App