वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात ओमिक्रॉनची तिसरी लाट मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये थैमान घालत असून त्याचा संसर्ग हा अन्य जिल्ह्यांमध्येही होत आहे. मुंबईपाठोपाठ नाशिक, नागपूर, सातारा, नगरमध्ये रुग्णवाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. Omicron is spreading in rural areas; After Mumbai, the number of patients increased in Nashik, Nagpur, Satara and other cities
राज्यात २ लाख २१ हजार रुग्ण असून, सुमारे ८९ टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये आहेत. या पाठोपाठ आता नाशिक, नागपूर, सातारा, नगर आणि औरंगाबादमध्ये रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
या महिन्यांत सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या २८ हजारांवर गेली आहे. डिसेंबरमध्ये हे प्रमाण सुमारे १ हजार ४१२ वर होते. ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आठवडाभरात तिप्पट वाढली आहे. ४ जानेवारीपर्यत राज्यात ६६ हजार ३०८ रुग्ण उपचाराधीन होते. ११ जानेवारीपर्यत ही संख्या २ लाख २१ हजारांवर गेली आहे.
Omicron is spreading in rural areas; After Mumbai, the number of patients increased in Nashik, Nagpur, Satara and other cities
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App