राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात स्वतः संघाने देशभरात आणि जगभरात असंख्य कार्यक्रम घेतले असताना आणखी एक वेगळाच पैलू संघाच्या दृष्टीने समोर आलाय, तो म्हणजे “संघाने असे करावे”, “संघाने तसे करावे”, असे सांगणाऱ्या फुकट सल्ला बाबूरावांचा सध्या सोशल मीडियावर सुळसुळाट दिसून राहिलाय!!
राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संघाचा द्वेष करावा, संघाच्या विरोधात वेगवेगळी वक्तव्य करत राहावीत, यात काही नवीन नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघाला मनुस्मृति टाकून संविधान स्वीकारायचा सल्ला द्यावा, नाहीतर संघ विसर्जित करायचा चंग बांधावा यातही काही नवे नाही. आत्तापर्यंत संघाला असा सल्ला देणारे किती आले आणि किती गेले, याची मोजदादही संघाने कधी केली नाही.
पण त्या पलीकडे जाऊन narrative set करण्यामध्ये जे कम्युनिस्ट आणि समाजवादी विचारसरणीचे नेते माहीर मानले जायचे, ते सुद्धा सध्या संघाला फुकट सल्ला बाबुराव या स्टाईलने सल्ला देऊन राहायलेत लागलेत किंवा उपदेश करून राहायलेत, यापेक्षा दुसरा मोठा राजकीय विनोद राहुल गांधी सुद्धा करू शकलेले नाहीत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा कारत यांनी संघावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर केलेली टीका ही जुन्याच मुद्द्यांवर आधारित होती. त्यात नवीन एकही मुद्दा नव्हता, हे संघ किंवा मोदींचे नव्हे तर मार्क्सवाद्यांचे वैचारिक दुर्दैव आहे.
– विचारांचा दुष्काळ
एरवी कम्युनिस्ट आणि समाजवादी नेते अत्यंत अभ्यासू मानले जातात. देशासमोर असलेल्या समस्यांची ते बुद्धिवादाने चिकित्सा करत असतात. त्यांच्या वकूबानुसार ते सरकारला सल्लाही देत असतात. कम्युनिस्ट आणि समाजवादी नेत्यांची भाषणे निदान पूर्वी तरी वैचारिक खाद्य पुरवणारी भाषणे मानली जायची. अनेकदा त्यातून नवे तर्कशुद्ध मुद्दे समजायचे, नवा दृष्टिकोन मिळायचा, नवा दृष्टिकोन विकसित व्हायचा, पण अलीकडच्या काळात हा अभ्यास हरवला आणि वैचारिक खाद्य देणे तर दूरच, खुद्द कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांमध्येच विचारांचा दुष्काळ पडल्याचे दिसून राहिलेय.
– फुकट सल्ला बाबूरावांचे पेव
तरीदेखील “संघाने कसे वाढावे??”, “संघाने पुढे कसे जावे??” “संघाने काय करू नये??”, वगैरे सल्ला देणाऱ्या फुकट सल्ला बाबूरावांचे पेव सोशल मीडियावर फुटलेले दिसले. स्वतःची वैचारिक बँक दिवाळखोरीत गेलेल्यांनी साने गुरुजींच्या समाजवादी विचारांची बँक ज्यांनी बुडविली, त्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतकर्त्यांनी अचाट मेंदूने प्रश्न विचारले आणि मुलाखतदेत्यांनी त्यांना पुचाट प्रयोगाची उत्तरे दिली. संघाने म्हणे मुस्लिम द्वेष सोडून मुस्लिमांमध्ये सुधारणा करणाऱ्या लोकांशी संपर्क साधून मुस्लिम समाज सुधारण्यासाठी लढावे, असा सल्ला साने गुरुजींच्या समाजवादी विचारांची बँक बुडविणाऱ्या बँकरने दिला. संघाने मुस्लिम समाजातल्या सुधारणावादी धर्मगुरूंशी संपर्क साधून आता दशक लोटले, संघाचा मुस्लिम विचार मंच विशिष्ट स्तरापर्यंत जाऊन काम करायला लागला, त्याचा परिणाम राम मंदिराच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत दिसून आला. प्रत्येक मशिदीत जाऊन शिवलिंग शोधायची गरज नाही एवढे महत्त्वाचे वक्तव्य सरसंघचालकांनी केले. संघातला हा आमुलाग्र बदल समजून घेणे तर दूरच, पण त्याचे साधे वैचारिक भान देखील वैचारिक दिवाळखोरीची बँक चालविणाऱ्यांना राहिले नाही.
ज्यांनी साने गुरुजींचा मूळ समाजवादी विचार बुडविला, जुना समाजवादी पक्ष तर कुठे गेला हे तर समजले सुद्धा नाही, त्यांनी संघ कशाप्रकारे वाढविला पाहिजे, याचा सल्ला देणे म्हणजे संघाला स्वतःची वैचारिक बँक धोक्यात आल्याचा इशारा देणेच होय!! संघाचे टीकाकार सुद्धा खऱ्या अर्थाने बुद्धिमान उरले नाहीत, याचेच हे लक्षण मानले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App