
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ३४,४०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३२० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये केरळ राज्यात सर्वाधिक २२,१८२ रुग्ण आढळले असून १७८ जण दगावले आहेत. कालच्या दिवसात देशात ३७ हजार ९५० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.Of 34,403 new #COVID19 cases and 320 deaths reported in the last 24 hours in India, Kerala recorded 22,182 COVID cases and 178 deaths, yesterday.
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. देशात चार दिवसांनी पुन्हा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. गुरुवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासां आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ४ हजारांनी वाढ झाली आहे. २४ तासांत ३४,४०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधितांची दहा दिवसांतील आकडा
- १० सप्टेंबर : ३३,३७६
- ११ सप्टेंबर : २८,५९१
- १२ सप्टेंबर : २७,२५४
- १३ सप्टेंबर : २५,४०४
- १४ सप्टेंबर : २७,१७६
- १५ सप्टेंबर : ३०५७०
भारतातील कोरोनाचे चित्र
गेल्या २४ तासात भारतात ३४ हजार ४०३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३२० रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ३७ हजार ९५० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी ३३ लाख ८१ हजार ७२८ वर गेला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २५ लाख ९८ हजार ४२४ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ४४ हजार २४८ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ३लाख ३९ हजार ५६ सक्रिय रुग्ण आहेत.
लसीकरण
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ७७ कोटी २४ लाख २५ हजार ७४४ असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
- देशात २४ तासात नवे रुग्ण –३४,४०३
- देशात २४ तासात डिस्चार्ज – ३७९५०
- देशात २४ तासात मृत्यू – ३२०
- एकूण रूग्ण –३,३३,८१,७२८
- एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – ३,३९०५६
- एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) –३,२५,९८,४२४
- एकूण मृत्यू – ४,४४,२४८
- आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या –
- ७७,२४,२५,७४४
- गेल्या २४ तासातील लसीकरण – ६३,९७,९७२
Of 34,403 new #COVID19 cases and 320 deaths reported in the last 24 hours in India, Kerala recorded 22,182 COVID cases and 178 deaths, yesterday.
महत्त्वाच्या बातम्या
- जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी, आदर पूनावाला, ममता बॅनर्जी यांचेही नाव
- अनिल देशमुख यांचे तत्कालिन खासगी सचिव संजीव पलांडे निलंबित, शंभर कोटींच्या प्रकरणात होते कोठडीत
- मोठी बातमी : भारताचे स्टॉक मार्केट जगातील 5वे सर्वात मोठे, BSE लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 260 लाख कोटी रुपयांवर
- Aukus : अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाची नवीन ‘सुरक्षा युती’ची घोषणा, फ्रान्सला धक्का, तर चीनची तिन्ही देशांवर आगपाखड
Array