भारतात दररोज १२ कोटींहून अधिक लोक ट्रेनने प्रवास करतात
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण दुर्घटनेवर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. यानिमित्त आर्थिक वर्ष २०१४ ते २०२२ या कालावधीत रेल्वे अपघातांची आकेडवारी समोर आली आहे. Odisha train accident 700 train accidents took place in the country from 2014 to 2022
प्राप्त आकडेवारीनुसार वर्ष 2014- 117, 2015-131, 2016-106, 2017-103, 2018-72, 2019-59, 2020-54, 2021-21, 2022-34 रेल्वे अपघात घडले आहेत.
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, भारतात दररोज 12 कोटींहून अधिक लोक 14,000 ट्रेनने प्रवास करतात. रेल्वे सुरक्षा सुधारण्यासाठी सरकारी प्रयत्न असूनही, भारतात रेल्वेचे शेकडो अपघात होतात. बहुतेक घटना मानवी चुकांमुळे किंवा कालबाह्य सिग्नलिंग उपकरणांच्या कारणांमुळे घडल्याचे दिसून आले आहे.
भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात भयानक दुर्घटना 1981 मध्ये घडली. बिहारमध्ये पूल ओलांडताना पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली आणि रेल्वेचे डबे बागमती नदीत बुडाले, या अपघातात 800 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अनेक प्रवाशांचे मृतदेह आजपर्यंत सापडलेले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App