Tamil Nadu : तामिळनाडूत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; आरोपींनी अपहरण केले, रेपनंतर दिंडीगुल रेल्वे स्थानकाजवळ सोडून काढला पळ

Tamil Nadu

वृत्तसंस्था

दिंडीगुल : कोलकातानंतर आता तामिळनाडूमध्ये  ( Tamil Nadu ) एका आरोग्य सेविकेवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. राज्यातील दिंडीगुलच्या थेणी येथील नर्सिंग विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञातांनी पीडितेचे अपहरण केले, यानंतर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर त्यांनी तिला दिंडीगुल रेल्वे स्थानकाजवळ सोडून पळ काढला.

जखमी पीडितेने रेल्वे स्थानकावर पोलिसांकडे मदत मागितली. पीडितेला दिंडीगुल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दिंडीगुल जिल्ह्याचे एसपी प्रदीप यांनी सांगितले की, एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



कोलकाता येथे 9 ऑगस्टला प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट रोजी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. 10 ऑगस्ट रोजी पोलिसांनी संजय रॉय नावाच्या नागरी स्वयंसेवकाला बलात्कार-हत्येच्या आरोपाखाली अटक केली. तो सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे.

या घटनेच्या निषेधार्थ बंगालसह देशभरातील कनिष्ठ डॉक्टर संपावर गेले. मात्र, 22 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बंगाल वगळता सर्व राज्यातील डॉक्टरांनी संप मागे घेतला.

बंगालमधील कनिष्ठ डॉक्टर 42 दिवसांच्या संपानंतर 21 सप्टेंबर रोजी कर्तव्यावर परतले. 14 सप्टेंबर रोजी सीबीआयने वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि पोलीस स्टेशनचे एसएचओ अभिजीत मंडल यांना बलात्कार-हत्या प्रकरणात पुराव्याशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

Nursing student gang-raped in Tamil Nadu; Accused abducted, raped and fled near Dindigul railway station

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात