विशेष प्रतिनिधी
पाटणा : Samastipur कोलकाता येथील डॉक्टरवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आता बिहारमधील समस्तीपूर येथील एका खासगी दवाखान्यात नर्सवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली. डॉक्टरने आपल्या मद्यधुंद मित्रांसह हा प्रकार केला. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. Samastipur
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संजयकुमार हा बुधवारी रात्री उशिरा दवाखाना बंद करून तिथेच दोन मित्रांसोबत दारू पीत बसला होता. दारूच्या नशेत या तिघांनी एका नर्सवर बळजबरी सुरू केली. स्वत:चा बचाव करण्याच्या प्रयत्नात तिने हाती लागलेल्या ऑपरेशन ब्लेडने डॉक्टरचे गुप्तांगच कापून टाकले. यानंतर ती पळून शेतात लपली. नंतर पोलिसांच्या ११२ हेल्पलाइनवर फोन करून मदत मागितली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन डॉक्टरसह तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिस अधीक्षक संजयकुमार पांडे यांनी शुक्रवारी सांगितले की, आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. न्यायालयाने या ितन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
Bhagyashree Atram : अजित पवार यांनी मला ज्ञान शिकवू नये, भाग्यश्री आत्राम यांनी थेटच सुनावले
उत्तर प्रदेशात मॉब लिंचिंग; विनयभंग करणाऱ्यास रेल्वेत मरेपर्यंत मारले
उत्तर प्रदेशात रेल्वेत ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला प्रवाशांनी बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना बरौनीहून दिल्लीला जाणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसमध्ये घडली. प्रशांतकुमार असे मृताचे नाव असून तो रेल्वेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे.
मूळचा बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असलेला आरोपी एसी कोचमध्ये जनरल तिकिटावर प्रवास करत होता. तो नवी दिल्लीला जात होता. लखनऊजवळ याच डब्यात प्रवास करणारी मुलीची आई शौचालयात गेली. ही संधी साधून आरोपीने ११ वर्षीय मुलीला बळजबरी करून आपल्या जागेवर बसवत अश्लील वर्तन केले. याबाबत तरुणीने तक्रार केली असता तिच्या कुटुंबीयांनी आणि प्रवाशांनी आरोपीला बेदम मारहाण करत कानपूर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने प्रशांतकुमार यास पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App