वृत्तसंस्था
भोपाळ : कालिचरण महाराजाने महात्मा गांधीजींबद्दल अवमानास्पद विधान केल्याच्या घटनेला काही दिवसच उलटत नाही, तोच पुन्हा एकदा तसा प्रयत्न झाला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे देशद्रोही होते, असे विधान करत भागवत कथाकार तरुण मुरारीबापू याने वाद निर्माण केला आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान तरुण मुरारीबापूने केलेल्या या विधानाबद्दल त्याच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल झाला आहे. Now young Muraribapu has squandered pearls about Mahatma Gandhi
एका कार्यक्रमादरम्यान तरुण मुरारीबापू म्हणाला की,‘‘गांधीही महात्माही नाहीत आणि राष्ट्रपिताही नाहीत. त्यांनी देशाचे तुकडे केल्याने त्यांना देशद्रोही म्हणायला हवे.’’ त्याच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेत काँग्रेसने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी तरुण मुरारीबापूविरोधात गुन्हा नोंदविला. या विधानाबाबत मुरारीबापूला आज विचारले असता, त्याने विधानावर ठाम राहण्याची भूमिका घेतली. काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडमधील रायपूर येथे आयोजित धर्मसंसदेत कालिचरण महाराजाने गांधीजींविरोधात आक्षेपार्ह विधान करत नथुराम गोडसेचे कौतुक केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App