आता ट्विटरवर लेख वाचण्यासाठी द्यावे लागतील पैसे, एलन मस्क यांची घोषणा, मीडिया पब्लिशर्सना शुल्क घेण्याची परवानगी

प्रतिनिधी

नवी दिल्ली : गर्भश्रीमंत एलन मस्क यांनी शनिवारी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर मोठे बदल जाहीर केले. त्यांनी ट्विट केले की, आता मीडिया प्रकाशकांना पुढील महिन्यापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लेख वाचण्यासाठी युझर्सना शुल्क आकारण्याची परवानगी दिली जाईल. Now you have to pay to read articles on Twitter, Elon Musk announces, allowing media publishers to charge

या फीचरच्या रोल आउटनंतर, ट्विटर वापरकर्त्यांना लेख वाचण्यासाठी मासिक सदस्यता घ्यावी लागेल. दुसरीकडे, अधूनमधून लेख वाचू इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांना प्रति लेख शुल्क भरावे लागेल. एलन मस्क यांनी हा मीडिया संस्था आणि जनतेसाठी मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.

कंटेंट क्रिएटर्सही ट्विटरद्वारे कमावू शकतील पैसे

ट्विटरने अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केले की ‘जगभरातील निर्माते आता साइन अप करू शकतात आणि ट्विटरवर कमाई करू शकतात. आज अर्ज करण्यासाठी, सेटिंग्जमध्ये मॉनेटायजेशनवर टॅप करा. यात अट अशी आहे की, ज्यांच्या खात्यात किमान 500 फॉलोअर्स आहेत केवळ तेच निर्माते याद्वारे पैसे कमवू शकतील. खाते व्हेरिफाइड केलेले असेल तर ते गेल्या 30 दिवसांपासून सक्रिय असले पाहिजे.



जगभरातील कंटेंट क्रिएटर्सना पाठिंबा

ट्विटरच्या ट्विटवर टिप्पणी करताना, एलन मस्क म्हणाले की जगभरातील कंटेंट क्रिएटर्सना समर्थन द्या! हा अनेक लोकांसाठी उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. हे त्यांना तुमच्यासाठी उत्तम कंटेंट तयार करण्यासाठी अधिक वेळ घालवण्यास प्रोत्साहित करते.

ट्विटरने शुल्क न घेता अनेकांना परत केले ब्लूटिक

21 एप्रिल रोजी ट्विटरने ट्विटर ब्लूचे सदस्यत्व न घेतलेल्या सर्वांच्या ब्लू टिक्स काढून टाकल्या. तथापि, दोन दिवसांनंतर, 23 एप्रिल रोजी, ट्विटरने 1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असलेल्या लोकांना ब्लू टिक बॅज परत केले. मृत पावलेल्या काही लोकांची नावेदेखील यात समाविष्ट आहेत ज्यांना पुन्हा ब्लू टिक मिळाली आहे. यामध्ये सुशांतसिंग राजपूत, इरफान खान, ऋषी कपूर यांसारख्या नावांचा समावेश आहे.

वेब युझर्ससाठी ब्लू सबस्क्रिप्शनची किंमत 650 रुपये

मस्क यांना 2023च्या अखेरीस ट्विटरला आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे आहे. महसूल वाढवण्यासाठी त्यांनी ब्लू सबस्क्रिप्शनसारख्या काही सेवांमध्ये बदल केले आहेत. ब्लू सबस्क्रिप्शन सेवेची किंमत भारतातील अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइल युझर्ससाठी दरमहा 900 रुपये आहे. वेब युझर्स 650 रुपये प्रति महिना ब्लू सबस्क्रिप्शन सेवा घेऊ शकतात.

Now you have to pay to read articles on Twitter, Elon Musk announces, allowing media publishers to charge

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात