Tirupati temple तिरुपती मंदिरात आता फक्त हिंदू कर्मचारीच काम करणार’

नातवाच्या वाढदिवशी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली घोषणा

विशेष प्रतिनिधी

तिरुमला येथील भगवान श्री वेंकटेश्वर मंदिरात फक्त हिंदूंनाच नोकरी दिली पाहिजे. असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, इतर धर्मातील कर्मचाऱ्यांची बदली केली जाईल. मंदिर मंडळ म्हणजेच तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाने गेल्या महिन्यात १८ बिगर-हिंदू कर्मचाऱ्यांची बदली केली होती.

शनिवारी मुख्यमंत्री नायडू यांचा नातू देवांश नायडूचा वाढदिवस होता. यानिमित्त मुख्यमंत्री त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह तिरुपती मंदिरात पोहोचले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, जर इतर धर्माचे लोक अजूनही मंदिरात काम करत असतील तर त्यांना आदरपूर्वक इतर ठिकाणी बदली केली जाईल. ते म्हणाले की, जर मुस्लिम किंवा ख्रिश्चन कर्मचाऱ्यांना हिंदू मंदिरात काम करायचे नसेल तर त्यांच्या भावनांचा आदर केला जाईल.

तिरुपतीमधील मुमताज बिल्डर्स, देवलोका आणि एमआरकेआर सारख्या हॉटेल डेव्हलपर्सना देण्यात आलेली ३५ एकर जमीन रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांनी सांगितले की ही जमीन जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिली होती. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आम्ही हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Now only Hindu employees will work in Tirupati temple

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात